मुजफ्फरपूर, 19 फेब्रुवारी : आयुष्यात अनेकदा मृत्यू आपल्याला चाटून जातो. अशावेळी माणसाला अजिबातच काही कळेनासं होतं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात मुजफ्फरपूरमध्ये (Uttar Pradesh Mujaffarpur) घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल (viral video) होतो आहे.
लग्नाच्या धामधुमीत निघालेल्या वराती आणि मनसोक्त नाचणारी नववधू (dancing brides) हे चित्र काही भारतीय विवाहांमध्ये (Indian weddings) नवीन नाही. एका वधूसाठी (bride) मात्र या क्षणांचा आनंद घेणं अगदीच जीवावर बेतणारं ठरलं. यातून ती अक्षरश: थोडक्यात बचावली.
लग्नाच्या वरातीतच ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशाच्या मुजफ्फरनगरमध्ये नई मंडी भागात मंगळवारी रात्री लग्नाच्या वरातीत भीषण अपघात झाला. एका लग्नाच्या वरातीत (wedding party) अचानक सुसाट आलेली कार (speedy car) घुसली. या कारनं अनेक वऱ्हाड्यांना चिरडलं. या अपघातात (accident0 एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि बाराहून अधिक लोक जखमी झाले.
हेमाचा अंकुरशी विवाह ठरला. मंगळवारी या लग्नाची वरात निघाली. ही वरात देहरादून हायवेवर (Dehradun Highway) जाणार होती. नववधू हेमा या सगळ्या क्षणामध्ये साहजिकच खूप आनंदात होती. तिनं कारचं रूफटॉप (car rooftop) उघडून कारमध्येच उभं राहत नाचायला सुरवात केली.
This dance could have been fatal - open sun-roofed car dancing Bride in UP's Muzaffarnagar has a narrow escape after a speeding vehicle hits Baraat on road leaving one dead and many injured @umeshpathaklive @Uppolice pic.twitter.com/hMmzhxTgsV
— Utkarsh Singh (@utkarshs88) February 17, 2021
वधूपक्षाचे काही लोकांनीही वधूसोबत हायवेवरच कारभोवती नाचू लागले. याचवेळी घात झाला. एक भरधाव वेगात आलेली कार या नाचणाऱ्या लोकांच्या जमावात घुसली. वर अंकुरचा चुलतभाऊ प्रमोद जागीच ठार झाला. इतरांना गंभीर जखमा झाल्या. जखमींना मीरतच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल होता.
हेही वाचा तरुणीच्या अंगावर धडकली दुचाकी; शिपायाची भररस्त्यात चपलेनं केली धुलाई,VIDEO VIRAL
हा सगळा भयानक प्रकार कॅमेऱ्यातही कैद (Captured in Camera) झाला. भरधाव वेगळ्या कारनं नाचणाऱ्या वरात्यांना कसं चिरडलं हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे. पोलिसांनी अपघाताच्या स्थळावरून चिरडणारी कार ताब्यात घेतली आहे. वाहनचालक मात्र घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Road accident, Shocking, Uttar pradesh