VIDEO : 'बलात्काराचे वेगवेगळे प्रकार असतात', भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान

भाजपच्या नेत्यांची जीभ दिवसेंदिवस खूपच घसरत असल्याचं दिसत आहे. नुकतंच भाजपच्या एका मंत्र्यानं बलात्कारासंदर्भात धक्कादायक विधान केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 07:12 AM IST

VIDEO : 'बलात्काराचे वेगवेगळे प्रकार असतात', भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान

लखनौ, 10 जून : भाजपच्या नेत्यांची जीभ दिवसेंदिवस खूपच घसरत असल्याचं दिसत आहे. नुकतंच भाजपच्या एका मंत्र्यानं बलात्कारासंदर्भात धक्कादायक विधान केलं आहे. 'बलात्काराचे वेगवेगळे स्वरूप असतात', असं वादग्रस्त विधान भाजपचे मंत्री उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे. तिवारी हे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री आहेत.

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात तिवारी यांनी रविवारी (9 जून) पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळेस तिवारी म्हणाले की,'बलात्काराचे वेगवेगळे प्रकार असतात. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला तर आपण त्यास बलात्काराची घटना असं मानू. पण काही घटनांमध्ये विवाहित महिला तसंच 7-8 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर पार्टनरवर बलात्काराचा आरोप केला जातो. तर त्यांनी सात वर्षांपूर्वी याबाबत विचार करायला हवा होता. या पार्श्वभूमीवर बलात्काराचे वेगवेगळे स्वरूप असतात'. महिलांसंदर्भातील असे धक्कादायक विधान तिवारी यांनी केलं आहे.

(पाहा :शरद पवारांचा पॉलिटिकल 'एअर स्ट्राईक' पाहा SPECIAL REPORT)(पाहा : VIDEO: नागपुरात भर रस्त्यात हिसकावलं महिलेचं मंगळसूत्र)

पुढे ते असंही म्हणाले की,'शहरात कोठेही बलात्काराची घटना घडल्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याची माहिती घेतात आणि आरोपींविरोधात कठोरातील कठोर कारवाई करणं, ही सरकारची जबाबदारी आहे '

काही दिवसांपूर्वी अलिगडमध्ये अडीच वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.

VIDEO : बलात्कार प्रकरणी भाजप मंत्र्याचं धक्कदायक विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 07:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...