मेरठ, 21 जानेवारी : वर्षाचा पहिला सण मकरसंक्रातीनिमित्त देशभरात लोकांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतलेला पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मोठमोठे पतंग उत्सवही भरवण्यात आले होते. आतापर्यंत तुम्ही विविध आकाराचे पतंग पाहिले असेल. मात्र, ही बातमी तुम्हाला तोंडात बोट घालायला लावणार आहे. सोन्याचा पतंगही उडू शकतो का, सोन्याचा धागाही असू शकतो का? पुलीही सोन्याची असू शकते का? या गोष्टी तुम्हाला अतिशयोक्ती वाटतील, पण असा पतंग यूपीच्या मेरठमध्ये तयार करण्यात आला आहे, जो निव्वळ सोन्यापासून बनवला आहे.
मेरठमध्ये झालेल्या इन्व्हेस्टर्स समिटमध्ये आलेल्या मंत्र्यांनाही सोन्याच्या पतंगाची दोरी धरण्याचा मोह आवरता आला नाही. यूपी सरकारमधील एमएसएमई मंत्री आरके सचान यांनी सोन्याचा पतंग असलेला स्टॉल पाहिला तेव्हा त्यांनी सोन्याच्या पतंगाची तार पकडली. दुसरी व्यक्ती सोन्याचा पतंग घेऊन दुसऱ्या बाजूला उभी होती.
वाचा - Republic Day 2023 : बैठकीच्या पहिल्या रांगेत रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यांना मान
सोन्याचा पतंग उडवल्यानंतर मंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जेव्हा मंत्र्याने या सोन्याच्या पतंगासोबत सेल्फी काढला तेव्हा मेरठचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीना यांनाही सोनेरी पतंगासोबत सेल्फी घेण्यापासून स्वतःला रोखता आले नाही. मंत्री आणि डीएम यांनी या अभिनवतेचे कौतुक केले. मंत्री आर.के.सचन म्हणाले की, त्यांनी अनेक पतंग पाहिले आहेत, पण सोन्याचा पतंग पहिल्यांदाच पाहिला.
यावेळी प्रजासत्ताक दिन आणि बसंत पंचमी एकत्र आल्याने सोन्याचे पतंग तयार केल्याचं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रजासत्ताक दिन आणि बसंत पंचमीच्या संगमानिमित्त मेरठच्या थापर नगरमध्ये सोन्याचे पतंग उडवले जाणार आहेत. या पतंगाची किंमत एकवीस लाख आहे. एकवीस लाख किमतीचा हा पतंग पूर्णपणे सोन्याचा आहे. सराफा व्यापारी अंकुर यांनी न्यूज 18 ला सांगितले की, प्रजासत्ताक दिनासाठी हा खास पतंग तयार करण्यात आला आहे. हा पतंग सोन्याचा आहे. सात कारागिरांनी 16 दिवसांत हा पतंग तयार केला आहे. त्याची खासियत म्हणजे त्यावर सोन्याचा थर आहे. तर त्याची तार आणि कप्पी देखील सोन्याची बनलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.