मराठी बातम्या /बातम्या /देश /

इन्स्पेक्टर असल्याचं सांगत हिंदू मुलींंशी करायचा लग्न; LOVE Jihad चं प्रकरण आलं समोर

इन्स्पेक्टर असल्याचं सांगत हिंदू मुलींंशी करायचा लग्न; LOVE Jihad चं प्रकरण आलं समोर

अबिद नावाचा हा व्यक्ती अगोदरच पाच मुलांचा बाप आहे. मात्र, तरीही तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांच्याशी लग्न करायचा. आबिद हा स्वतःला गुन्हे शाखेचा इन्स्पेक्टर आदित्य सिंग असल्याचे सांगायचा.

  • Published by:  News18 Desk
आजमगड, 31 मे : समाजामध्ये चांगल्या वृत्तीच्या लोकांबरोबरच वाईट प्रवृत्ती ठेवून काम करणारे अनेक लोक आहेत. एकीकडे एकही लग्न होत नसताना एक भामटा मुलींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्याशी लग्न (marriage) करायचा आणि महत्त्वाचे म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलींना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडले जायचे. अबिद नावाचा हा व्यक्ती अगोदरच पाच मुलांचा बाप आहे. मात्र, तरीही तो तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांच्याशी लग्न करायचा. आबिद हा स्वतःला गुन्हे शाखेचा इन्स्पेक्टर आदित्य सिंग असल्याचे सांगायचा. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील आजमगड येथील आहे. पोलिसांनी इंदिरानगर सेक्टर 9 भागामध्ये त्याला पकडले आणि अटक केली. दोन लग्न केल्यानंतर त्यानं तिसरं लग्न दुसऱ्या धर्मातील एका मुलीबरोबर फेब्रुवारी महिन्यात केलं. त्यानं परिसरातील एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तो तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवत होता. त्यामुळे नंतर या तरुणीनं त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला. त्यानंतर मात्र त्यानं आपलं खरं रूप सांगत आपला अगोदर विवाह झाला असल्याचे तिला सांगून तिच्याशी लग्न केलं. निकाह झाल्यानंतर धर्म परिवर्तन करून या तरुणीचं नाव त्यानं आयशा असं ठेवलं होतं. दुसरं लग्न झाल्यानंतरही सर्व काही ठीक सुरू होतं. मात्र एवढं करूनही हा नराधम शांत बसला नाही. हे वाचा - …नाहीतर तुझ्या पोरीला पळवून नेऊ; बीडमध्ये तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या फेब्रुवारी महिन्यात त्यानं मध्यप्रदेशमधील एका तिसऱ्या मुलीसोबत आपण हिंदू असल्याचे सांगून लग्न केले. त्यावेळी मात्र दुसऱ्या पत्नीनं त्याच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार, फसवणूक, लव्ह जिहाद इत्यादी कारणांवरून तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी आबिदला अटक केली असून त्याची तपासणी सुरू आहे. त्याच्याकडं आदित्य सिंह नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची आयडेंटिटी कार्ड सापडले आहे. पोलिसांनी ते जप्त केले असून पुढील कारवाई सुरू आहे. अलिकडं लग्न करताना खूप खबरदारी घेतली जात असताना लोक अशाप्रकारे एखाद्या भामट्याच्या अमिषाला भूलतात. संपूर्ण आयुष्यभराचा प्रश्न असल्यानं तरुणींनी अशा एखाद्याच्या तावडीत सापडून नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
First published:

Tags: Crime news, Love jihad

पुढील बातम्या