बसच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, 30 जण गंभीर जखमी

बसच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, 30 जण गंभीर जखमी

बसने ट्रकला इतकी जबरदस्त धडक दिली की यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:

मैनपुरी, 21 एप्रिल : उत्तर प्रदेशातील मैनपुरीत आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस-वेवर बसचा भीषण अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 30हून अधिकजण जखमी झाले आहेत. व्हॉल्वो बस आणि ट्रकची जोरात टक्कर झाली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. वाराणसीहून दिल्लीकडे जाणाऱ्या बसला हा अपघात झाला आहे. यात 40 जण प्रवास करत होते. एक्स्प्रेस वेवर उभा असलेला ट्रक लक्षात न आल्याने वेगाने जाणारी बस ट्रकवर आदळली.

अपघातात जागीच 6 जणांचा मृत्यू झाला. यात 30 हून जास्त लोक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 08:15 AM IST

ताज्या बातम्या