'मला का नाही कोरोना झाला?', पतीच पार्थिव पाहून पत्नीनं सांगितली आपली प्रेम कहाणी आणि...

'मला का नाही कोरोना झाला?', पतीच पार्थिव पाहून पत्नीनं सांगितली आपली प्रेम कहाणी आणि...

उत्तर प्रदेशच्या बरेली येथे कोरोनाचा आज पहिला बळी गेला. या मृत्यूनंतर संपूर्ण बरेलीला एका क्षणानं हादरून सोडलं.

  • Share this:

बरेली, 30 एप्रिल : देशात कोरोनानं थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आणि मृतांच्या संख्या वाढत आहे. अशातच उत्तर प्रदेशच्या बरेली येथे कोरोनाचा आज पहिला बळी गेला. बरेलीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय वजीर अहमद यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानंतर वजीर यांचा मृत्यू झाला. वजीर यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण बरेलीला एका क्षणानं हादरून सोडलं.

वजीर यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी बेशुद्ध पडली. त्यांच्या पत्नीला विश्वासच बसत नव्हता की ज्या पतीनं सात जन्माच्या नात्याचं वचन दिलं होतं आता एकटीला सोडून निघून गेला. सोशल मीडियावर वजीरच्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दूरवरुन रडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ खूप भावून करणारा आहे, कारण वजीर यांची पती आपल्या पतीचं पार्थिव पाहून आयुष्यातील सर्व एकत्र घालवलेले क्षण ओरडून सांगत होती.

वाचा-गाडी पकडताच रडत सांगितलं आजोबांचं निधन झालं, पण पोलिसांनी खरी माहिती काढली आणि...

हॉस्पिटलच्या वॉर्डात पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या आपल्या पतीच्या देहाला पाहून तिचा विश्वास बसत नव्हता. व्हिडीओमध्ये वजीर अहमदची पत्नी पतीचा मृतदेह पाहून ढसाढसा रडत होती. त्याच अवस्थेत तिनं आपली लव्हस्टोरी सांगण्यात सुरुवात केली. बायकोचं बोलणं ऐकून सगळे स्तब्ध झाले. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. वजीर यांची पत्नी, "जर तुला कोरोना झाला तर मला का नाही झाला. आपल्या मुलांना का नाही झाला. तुम्हीच का एकटे गेलात?", असे म्हणत होती. यावेळी त्या वजीर अहमदने जेव्हा पहिल्यांदा त्यांना पाहिले तेव्हा गायलेले एक गाणं त्या गुणगुणत होत्या.

वाचा-भविष्यातील महासाथीपासून जगाला वाचवणारे 'व्हायरस हंटर्स'

एसीएमओ डॉ. रंजन गौतम यांनी मृत्यूची माहिती देत सांगितले की 35 वर्षीय वजीर अहमद यांनाही दमा आणि मधुमेह होता. ते म्हणाले की, बुधवारी पहाटे 3.30च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सध्या आरोग्य विभाग वजीर यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध घेत आहेत.

वाचा-नागपूरमध्ये संतापजनक घटना, पोलिसाला मारहाण करून गाडीची काच फोडली

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 30, 2020, 12:22 PM IST

ताज्या बातम्या