मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Election: अपमानित, बलात्कार, छेडछाडीला बळी पडलेल्या महिलांना काँग्रेस निवडणुकीत उतरवणार, काय आहे Priyanka Gandhi ची रणनिती?

UP Election: अपमानित, बलात्कार, छेडछाडीला बळी पडलेल्या महिलांना काँग्रेस निवडणुकीत उतरवणार, काय आहे Priyanka Gandhi ची रणनिती?

UP Assembly Elections 2022: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यूपीमध्ये काँग्रेसचे 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 40 टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे.

UP Assembly Elections 2022: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यूपीमध्ये काँग्रेसचे 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 40 टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे.

UP Assembly Elections 2022: काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी यूपीमध्ये काँग्रेसचे 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 40 टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

नवी दिल्ली, 13 जानेवारी : 'तुम्ही निवडणूक लढवा, आमदार व्हा, सत्ता हातात घ्या आणि लढा' असे म्हणत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील महिलांना आवाहन केले होते. 'लड़की हूं, लड़ सकती हूं'ची घोषणा देण्यात आली. आता काँग्रेसने मुलींना निवडणुकीत उतरवण्याची तयारी केली आहे. अपमानित, बलात्कार, छेडछाडीला बळी पडलेल्या महिलांची यादी प्रदेश काँग्रेस तयार करत आहे. उन्नाव बलात्कार पीडितेची आई, हाथरस गँगरेप पीडितेची वहिनी किंवा आई, पंचायत निवडणुकीत अभद्रतेचा बळी ठरलेल्या रितू सिंगला तिकीट निवडणूक मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. यापैकी उन्नाव बलात्कार पीडितेची आई आशा देवी यांना पहिल्या यादीत तिकीट देण्यात आलं आहे.

त्या महिलांना आमच्या यादीत स्थान : प्रियंका गांधी

आमच्या यादीत अशा महिला असतील ज्यांना स्वतःसाठी उभे राहायचे आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. ज्यांना लढायचे आहे, ज्यांचा छळ झाला आहे. अशा पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्या महिलांना निवडणूक लढवण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर तिकीट देण्याचा निर्णय घेतला जाईल. यामध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई आशा देवी यांना पक्षाची निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.

2017 मध्ये उन्नावच्या बांगरमाऊ मतदारसंघातील भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेने सांगितले की, ती आमदाराच्या घरी नोकरी मागण्यासाठी गेली होती, तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या यादीत माजी सपा नेत्या रितू सिंह यांचाही समावेश आहे. पंचायत निवडणुकीत त्यांची साडी ओढून त्यांना अपमानित करण्यात आल्याची घटना घडली होती. याशिवाय हातरसमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या कुटुंबातील महिलेलाही तिकीट देण्याची तयारी सुरू आहे.

125 उमेदवारांच्या यादीत 50 महिला

पत्रकार परिषदेत प्रियंका गांधी म्हणाल्या, “125 उमेदवारांच्या यादीत 50 महिला आहेत. संपूर्ण राज्यात संघर्ष करणारे आणि नव्या राजकारणाची सुरुवात करणारे उमेदवार असावेत, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही यूपीच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकू, असा आमचा प्रयत्न आहे.

समस्या केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे- प्रियांका

प्रियंका म्हणाल्या, "या यादीत काही महिला पत्रकार आहेत. एक अभिनेत्री आणि बाकीच्या संघर्षशील महिला आहेत, ज्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक वर्षे संघर्ष केला. आज यूपीमध्ये हुकूमशाही सरकार आहे. या समस्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे".

नेत्यांनी काँग्रेस सोडल्याच्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या, "प्रत्येक निवडणुकीत असे घडते. काही लोक येतात, काही लोक जातात. काही घाबरतात, आपल्या संघर्षाला धैर्याची गरज आहे. कोणी निघून गेल्यावर त्रास होतो".

यूपी निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार

10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.

First published:

Tags: Election, Priyanka gandhi, काँग्रेस