मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Election Result 2022: यूपीत फुललं कमळ, उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या विजयामागे आहेत ‘ही’ पाच कारणं

UP Election Result 2022: यूपीत फुललं कमळ, उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या विजयामागे आहेत ‘ही’ पाच कारणं

UP Election Result 2022:  सर्व प्रतिकूल आव्हानं असतानाही योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना पिछाडीवर टाकत बाजी मारली आहे असंच म्हणावं लागेल. यामागे पाच महत्त्वाची कारणं आहेत.

UP Election Result 2022: सर्व प्रतिकूल आव्हानं असतानाही योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना पिछाडीवर टाकत बाजी मारली आहे असंच म्हणावं लागेल. यामागे पाच महत्त्वाची कारणं आहेत.

UP Election Result 2022: सर्व प्रतिकूल आव्हानं असतानाही योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना पिछाडीवर टाकत बाजी मारली आहे असंच म्हणावं लागेल. यामागे पाच महत्त्वाची कारणं आहेत.

 उत्तर प्रदेश, 10 मार्च:  देशातील सगळ्यात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालाकडे (Election Result) सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. भाजपचा (Bhartiya Janata Party -BJP) हा बालेकिल्ला असल्यानं भाजपनं इथं सत्ता आपल्याच हाती राहावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. त्याचवेळी या आधी दीर्घकाळ उत्तर प्रदेशची सत्ता आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या समाजवादी पक्षाच्या (Smajawadi Party) अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही पुन्हा सत्तेवर येण्यासाठी आपलं संपूर्ण बळ पणाला लावलं होतं. त्यांनी अनेक मोठमोठी आश्वासनं जनतेला दिली होती, मात्र आतापर्यंतचा निवडणूक निकालांचा कल पाहता भारतीय जनता पक्ष आघाडीवर असून बहुमताच्या आधारावर स्वबळावर उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करू शकेल असं दिसतंय. एक्झिट पोलचे (Exit Pole) अंदाज बर्‍याच अंशी बरोबर असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही तासांत इथलं संपूर्ण राजकीय चित्र स्पष्ट होईल. सर्व प्रतिकूल आव्हानं असतानाही योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना पिछाडीवर टाकत बाजी मारली आहे असंच म्हणावं लागेल. यामागे पाच महत्त्वाची कारणं आहेत. त्याबाबत अमर उजालाने सविस्तर विश्लेषण केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या सहा महिन्यांत अनेक राजकीय समीकरणं बदलली. सहा महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एकतर्फी लढत होणार म्हणजे योगी आदित्यनाथच पुन्हा निवडणूक जिंकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र लवकरच चित्र बदललं. निवडणुकाजवळ आल्या तिथं भाजपच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागलं. योगींच्या तीन मंत्र्यांसह एकापाठोपाठ एक 11 आमदारांनी पक्ष सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आणि तिथूनच समाजवादी पक्षाने आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकतो, अशी चर्चाही सुरू झाली; मात्र आजच्या निकालांचा कल पाहता भाजपनं या सर्व शक्यता धुळीला मिळवल्या असल्याचं स्पष्ट होतं. यासाठी पाच मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरले. महिलांचा पूर्ण पाठिंबा : गेल्या काही निवडणुकांमध्ये महिला मतदार वर्ग (Woman Voters) ही भाजपची सर्वांत मोठी ताकद ठरली आहे. पंतप्रधान आवास योजनेपासून उज्ज्वला गॅस योजना आणि वीज योजनेपर्यंत अनेक योजनांनी महिलांना दिलासा दिला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेही महिलांचा भाजपला पाठिंबा वाढला आहे. उत्तर प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात महिलांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पाठिंबा दिला आहे. UP Election Result 2022: यूपीत भाजपनं उधळला विरोधकांचा रंग,  'बुलडोझर बाबा' चा अनोखा जल्लोष एकदा बघाच   कायदा आणि सुव्यवस्था : योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं राज्यात निर्माण केलेल्या उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेच्या (Law and Order) वातावरणापुढे स्वस्त वीज, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, शिक्षामित्रांची सहाय्यक शिक्षक म्हणून फेरनियुक्ती आणि जुन्या पेन्शनची अंमलबजावणी यासारख्या मोठमोठ्या निवडणूक घोषणाही अपयशी ठरल्या. कायदा आणि सुव्यवस्था चांगली असेल तर राज्याचा विकास वेगाने होईल, हे लोकांना पटवून देण्यात योगी आदित्यनाथ यशस्वी ठरले. एवढंच नाही तर निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध झालेले सपा नेत्यांचे वादग्रस्त व्हिडिओही अखिलेश यांच्या विरोधात गेले. त्यामुळे अखिलेश यादव यांनी योगी यांच्याविरुद्ध विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो सगळा निष्फळ ठरला. महिलांनीही अखिलेश यांच्या मोठ्या आश्वासनांपेक्षा योगींच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अधिक विश्वास व्यक्त केला.मुस्लिम महिलांनीही भाजप सरकारला मतदान केलं असल्याचं या निवडणूक निकालांवरून स्पष्टपणे दिसून येत असल्याचं राजकीय विश्लेषक प्रा. अजय कुमार सिंह यांनी म्हटलं आहे. दलित मतदारांचाही भाजपला कौल : सपा सरकार सत्तेवर असताना दलितांवरील (Dalit) अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली होती. त्यामुळे या निवडणूकीत दलितांचा विश्वास जिंकण्याचे सपाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र भाजपनं दलितांचा विश्वास जिंकला. बसपानंतर दलित मतदारांचा विश्वास मिळवण्यात यश आलं आहे ते भाजपला. सुमारे 70 टक्के दलित मतदार बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये गेले आहेत. भाजपच्या विजयासाठी हा महत्त्वाचा घटक होता,' असं ज्येष्ठ पत्रकार प्रमोद श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. मोफत रेशन : कोरोना साथीच्या काळात (Coronavirus Pandemic) भाजप सरकारनं जवळपास तीन वर्षे गरीबांना मोफत रेशन (Free Ration) दिलं. गावा-गावातील लोकांनी त्याचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमीच त्यांच्या सभांमध्ये, रॅलींमध्ये याचा उल्लेख करायचे. याचा फायदा भाजपला झाला. किसान सन्मान निधी आणि गृहनिर्माण योजना: पंतप्रधान किसान सन्मान (Kisan Samman) योजनेअंतर्गत, अल्प भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. त्यामुळं खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. याशिवाय गरीब आणि मध्यमवर्गीयांना घरकुल योजना आणि शौचालयांसाठी भरीव रक्कम अनुदान स्वरुपात दिली जाते. निवडणुक प्रचारात भाजपसाठी या योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. UP Election Result 2022: योगींच्या प्रचंड विजयानंतर का चर्चेत आहेत मुनव्वर राणा? या पाच महत्त्वाच्या कारणांमुळे अखिलेश यादव यांची मोठमोठी आश्वासनेही जनतेचं मन जिंकू शकली नाहीत. उत्तर प्रदेशच्या जनतेनं योगी आदित्यनाथ आणि भाजप यांनाच पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची संधी दिली असल्याचं आताच्या कलावरून दिसत आहे. संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत संपूर्ण निकाल लागतील आणि चित्र पूर्ण स्पष्ट होईल.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Assembly Election, Uttar pradesh news, Yogi Aadityanath

पुढील बातम्या