उत्तर प्रदेशात भाजपला दिलासा : निवडणुकीचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे

उत्तर प्रदेशात भाजपला दिलासा : निवडणुकीचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे

उत्तर प्रदेशमध्ये मतदान नेमकं कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं यावर तिथली राजकीय समीकरणं अवलंबून असतात. राज्यात पश्चिमेकडून मतदान सुरू होऊन पूर्वेकडे झालं तर त्याचा पॅटर्न काय असतो हे 15 वर्षांच्या अनुभवातून समोर आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च : उत्तर प्रदेशमध्ये मतदान नेमकं कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं यावर तिथली राजकीय समीकरणं अवलंबून असतात. राज्यात पश्चिमेकडून मतदान सुरू होऊन पूर्वेकडे झालं तर त्याचा पॅटर्न काय असतो हे 15 वर्षांच्या अनुभवातून समोर आलं आहे.

निवडणुकीत मतदानाचे टप्पे ठरवण्यात काय राजकारण दडलेलं आहे ? खासकरून उत्तर प्रदेशसारख्या विविधता जपणाऱ्या भल्यामोठ्या राज्यात याचे परिणाम नक्की होतात.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि इथलं मतदान 7 टप्प्यांत होणार आहे. हे मतदान पश्चिम उत्तर प्रदेशपासून सुरू होणार आहे. म्हणजेच दिल्लीला लागून असलेल्या मतदारसंघात पहिल्यांदा मतदान होईल. शेवटच्या ट्प्प्यातलं मतदान मे महिन्याच्या मध्यात होणार आहे. हे मतदारसंघ बिहारच्या जवळचे आहेत.

भाजपचे नेते निवडणुकांच्या तारखांवर बारीक लक्ष ठेवून होते. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमध्ये 7 टप्प्यांत निवडणूक घेण्याची घोषणा केली आणि पश्चिम उत्तर प्रदेश पहिल्यांदा मतदानाला सामोरा जाणार हे ठरलं तेव्हा त्यांना दिलासा मिळाला.

2014 च्या निवडणुकीत वाराणसी आणि आझमगड या मतदारसंघात जोरदार लढत होती. वाराणसीमधून नरेंद्र मोदी आणि आझमगडमधून मुलायमसिंग यादव लढत होते. ही निवडणूक पूर्वांचलमधल्या या मतदारसंघात पोहोचली तेव्हा इथल्या लढतींनी कळस गाठला होता.

लोकसभा निवडणुकीतले बाकी राजकीय घटक कायम राहतात पण निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात पक्षाने चांगली कामगिरी करणं महत्त्वाचं आहे, असं एका भाजप नेत्याने NEWS 18 ला सांगितलं. मागच्या निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपची कामगिरी चांगली होती. त्यामुळे बाकीच्या भागांत आम्ही विरोधकांना चांगली लढत दिली,असं ते म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांपेक्षा लोकसभेची निवडणूक विविधरंगी होणार आहे.विधानसभा निवडणुकीत हे मतदान पूर्वेकडून पश्चिमेकडे झालं होतं आणि त्याचा प्रादेशिक पक्षांना फायदा झाला. त्यावेळी मुलायमसिंग यादव यांना पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही चांगलं यश मिळालं.

उत्तर प्रदेशचं राजकारण मुस्लीम मतदारांच्या प्रभावावरही अवलंबून असतं. लोकसभा निवडणुकीचे ट्प्पे पाहिले तर यावेळी मुस्लीम मतांचाही अंदाज घेणं तुलनेने सोपं होणार आहे.

यासाठीच भाजपला नेहमीच ही निवडणूक पश्चिमेकडून सुरू व्हायला हवी असते. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक सुरू झाली तर समाजवादी पक्षाला त्याचा फायदा होतो.

असं असलं तरी प्रत्येक निवडणुकीचं स्वरूप वेगळं असतं. या निवडणुकीत भाजप केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्तेत आहे. त्यामुळेच भाजपला सत्ताविरोधी मतांचाही सामना करावा लागेल, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची कसोटी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या