Home /News /national /

UP Election : 2 मंत्री, 6 आमदार, 12 माजी आमदारांची सोडचिठ्ठी, भाजपला खूप मोठा झटका

UP Election : 2 मंत्री, 6 आमदार, 12 माजी आमदारांची सोडचिठ्ठी, भाजपला खूप मोठा झटका

समाजवादी पार्टीचे नेता आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी दिलेले स्वामी प्रसाद मौर्य, धर्म सिंह सैनी, भागवती सांगर आणि विनय शाक्य यांच्यासह अनेक आमदार आणि माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला

पुढे वाचा ...
    लखनऊ, 14 जानेवारी : उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राज्यात समाजवादी पार्टीला (SP) चांगलीच बळकट मिळताना दिसत आहे. तर भाजपला एकामागे एक असे मोठमोठे झटके बसताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचा लखनऊमध्ये पक्षांतराचा आज खूप मोठा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात योगी सरकारमधील दोन मंत्री, 6 आमदार यांच्यासह 12 पेक्षा जास्त माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. समाजवादी पार्टीचे नेता आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी दिलेले स्वामी प्रसाद मौर्य, धर्म सिंह सैनी, भागवती सांगर आणि विनय शाक्य यांच्यासह अनेक आमदार आणि माजी आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजप आणि बसपाच्या एकूण जवळपास 20 माजी आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपवर निशाणा स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केल्यानंतर भाजपवर सडकून टीका केली. "मी विचार केलेला की एवढ्या वर्षांचा वनवास सोसल्यानंतर भाजप चांगलं काम करेल. पण भाजपने तसं केलं नाही. मी भाजपला सांगू इच्छितो आज जो कार्यक्रम होतोय त्याचा मोठा फटता भाजपला होईल. अखिलेश यादव सुशिक्षित आणि तरुण आहेत. उत्तर प्रदेशातील लाखो नागरिक एकत्र येतील आणि भाजपला नेस्तनाबूत करतील", असा घणाघात स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला. (पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा तुंबळ हाणामारी, टोळक्यानं लोखंडी सळईने केले वार) "मी ज्यांची साथ सोडतो, त्यांचं काहीच अस्तित्व राहत नाही. आमची बहीण हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्यांनी काशीरामजींचा नारा बदलला, मी त्याला विरोध केला. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. अखेर त्यांचं काहीच अस्तित्व राहिलं नाही", असा दावा स्वामी प्रसाद मौर्य यांनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 80 विरुद्ध 20 च्या वक्तव्यावरही स्वामींनी प्रतिक्रिया दिली. "खरंतर लढाई 80 विरुद्ध 20 ची नाहीय, तर 85 विरुद्ध 15 अशी आहे. तुम्ही हिंदूंचे सहानुभूतीदार असाल तरी मागास, अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षण का लुटता?", असा सवाल स्वामींनी उपस्थित केला. भाजप सोडणाऱ्या आमदारांची यादी 1. स्वामी प्रसाद मौर्य 2. भगवती सागर 3. रोशनलाल वर्मा 4. विनय शाक्य 5.अवतार सिंह भड़ाना 6.दारा सिंह चौहान 7.बृजेश प्रजापति 8.मुकेश वर्मा 9.राकेश राठौर 10.जय चौबे 11.माधुरी वर्मा 12.आर के शर्मा 13. बाला प्रसाद अवस्थी 14.डॉ. धर्म सिंह सैनी 15. चौधरी अमर सिंह उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फ्रेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च, 7 मार्चला मतदान होईल. या निवडणुकीचे निकाल 10 मार्चला समोर येईल.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या