मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Election 2022: निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराची पहिली यादी जाहीर, उन्नाव पीडितेच्या आईलाही उमेदवारी

UP Election 2022: निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराची पहिली यादी जाहीर, उन्नाव पीडितेच्या आईलाही उमेदवारी

UP Election 2022 congress releases first list of 125 canidates : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 40 टक्के महिला उमेदवारांचा समावेश आहे.

  • Published by:  Sunil Desale

लखनऊ, 13 जानेवारी : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) काँग्रेस पक्षाकडून (Congress party) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 125 उमेदवारांची नावे असून त्यात एकूण 40 टक्के महिला उमेदवाराचा समावेश आहे. उमेदवारांच्या या यादीत उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाचाही समावेश आहे.

बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट

प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आण्ही 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत यामध्ये 50 महिला उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात संघर्ष करणारे आणि नव्या राजकारणाची सुरुवात करणारे उमेदवार असावे असा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही उत्तरप्रदेशाच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकू असा आमचा प्रयत्न आहे.

वाचा : महिन्याभरात एक-दोन नाही तर तब्बल 13 नेत्यांचा भाजपला रामराम

प्रियंका गांधी म्हणाल्या, आम्ही आज जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत काही महिला पत्रकार सुद्धा आहेत. एका अभिनेत्रीचाही समावेश आहे तर इतर संघर्षशील महिला आहेत ज्यांनी काँग्रेस पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष केला आहे. आज उत्तरप्रदेशात हुकूमशाही सरकार आहे. उत्तरप्रदेशातील समस्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडल्याच्या वृत्तावर प्रियंका गांधी यंना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटलं, प्रतेयक निवडणुकीत असे प्रकार घडत असतात. काही लोक येतात आणि काही लोक जातात. आपल्या संघर्षाला धैर्याची गरज आहे. कुमीहीह पक्षातून गेल्यास त्यचा त्रास होतोच.

उत्तरप्रदेशात सात टप्प्यांत मतदान

उत्तरप्रदेशात एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला, दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी, सहाव्या टप्प्यात 3 मार्च, सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर पाचही राज्यांची 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

5 राज्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं

केंद्रीय निवडणूक आयोगाने गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

पहिल्या टप्पा - 10 फेब्रुवारीला मतदान

दुसरा टप्पा -14 फेब्रुवारी

तिसरा टप्पा -20 फेब्रुवारी

चौथा टप्पा -23 फेब्रुवारी

पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी

सहावा टप्पा - 3 मार्च

सातवा टप्पा -7 मार्च

First published:

Tags: Election, Priyanka gandhi, Uttar pradesh, काँग्रेस