जिल्हाधिकाऱ्यांनी केले शहीद जवानाच्या मुलीचे कन्यादान!

जिल्हाधिकाऱ्यांनी केले शहीद जवानाच्या मुलीचे कन्यादान!

शिवानीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून लग्नात सहभागी होण्याती विनंती केली होती. देवरिया जिल्ह्यातील या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

  • Share this:

देवरिया, 3 डिसेंबर : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील देवरिया (Deoria) चे जिल्हाधिकारी अमित किशोर (DM Amit Kishore) यांनी जिल्ह्यातील हुतात्मा जवानाच्या मुलीचे कन्यादान केले. शिवानी रावत असे विवाहित तरुणीचे नाव आहे. शिवानीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून लग्नात सहभागी होण्याती विनंती केली होती. देवरिया जिल्ह्यातील या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

तरुणीने लिहिले होते पत्र

देवरिया जिल्ह्यातील अजय कुमार रावत हे बीएसफ (BSF) च्या 88 व्या बटालियनमध्ये तैनात होते. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूरमध्ये 25 ऑगस्ट 2018 रोजी एका घटनेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी किशोर हे अजय कुमार यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. कुमार यांच्या मृत्यूनंतर परिवाराची परिस्थिती खालावली. कुमार यांची मुलगी शिवानीने जिल्हाधिकारी अमित किशोर यांना एक भावनिक पत्र लिहिले होते. त्यामध्ये तिने कुमार यांना लग्नात सहपरिवार सहभागी होण्याची विनंती केली. शिवानीचे भावनिक पत्र मिळताच जिल्हाधिकारी किशोर पत्नीसह हुतात्मा जवानाच्या घरी दाखल झाले. त्यांनी शिवानीच्या लग्नात वडिलांची सर्व कर्तव्यं बजावली.

लग्नाचे वातावरण बदलले

जिल्हाधिकारी किशोर लग्नघरी दाखल होताच, त्या घरातील वातावरण बदलले. लग्नाला अगदी उत्सवी स्वरुप आले. कन्यादान करताना किशोर खूप भावुक झाले होते.“मी लग्नाला यावं अशी शिवानी इच्छा होती. देशासाठी हुतात्मा झालेल्या परिवाराची काळजी घेण्याचे काम प्रशासनाचे आहे. मी ते काम पूर्ण केले’’,  असे किशोर यांनी यावेळी सांगितले. तर “माझ्या विनंतीला मान देऊन जिल्हाधिकारी लग्नाला आले ही अभिमानाची गोष्ट आहे,’’ अशी भावना शिवानीने व्यक्त केली.

Published by: News18 Desk
First published: December 3, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या