Home /News /national /

पत्रकाराची लोखंडी रॉडनं मारहाण करून हत्या, 2 आरोपींना अटक

पत्रकाराची लोखंडी रॉडनं मारहाण करून हत्या, 2 आरोपींना अटक

स्थानिक पत्रकार सुधीर सैनी (Sudhir Saini) यांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. कार ओव्हरटेक केल्याच्या वादातून झालेल्या भांडणात सुधीरला आपला जीव गमवावा लागला.

    उत्तर प्रदेश, 27 जानेवारी: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये (Saharanpur) स्थानिक पत्रकार सुधीर सैनी (Sudhir Saini) यांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. कार ओव्हरटेक केल्याच्या वादातून झालेल्या भांडणात सुधीरला आपला जीव गमवावा लागला. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सुधीर सैनी यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पत्रकार सुधीर सैनी हे सहारनपूरच्या कोतवाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चिलकाना रोडवरून बाईकवरुन सहारनपूरला येत होते. तेथे सुधीरची ओव्हरटेकिंगवरून कारमधील तीन तरुणांशी बाचाबाची झाली. त्यानंतर कारमधील तरुणांनी सुधीरला मारहाण करण्यास सुरुवात केली. 600 हून अधिक बेपत्ता मुलांना घरी आणणारा कोण आहे हा बजरंगी भाईजान या मारहाणीत सुधीरला जबर दुखापत झाली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुधीर सैनी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या कारच्या क्रमांकावरून कार थांबवली आणि कार ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी मृत सुधीरचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे. एसएसपी आकाश तोमर यांनी सांगितले की, रोड रेजमध्ये पत्रकार सुधीर सैनी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या जहांगीर आणि फरमान यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपींवर कारवाई केली जाईल. नेमकी घटना काय? पत्रकार सुधीर सैनी हे बाईकवरून सहारनपूरला जात होते, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची बाईक मागून येणाऱ्या कारला धडकली, त्यानंतर वाद वाढला आणि आरोपींनी लोखंडी रॉडने हल्ला केला. पत्रकाराच्या हत्येनंतर सहारनपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या