मराठी बातम्या /बातम्या /देश /सुरक्षेसाठी चौकीत येणाऱ्यांवर गंगाजल-चंदनाचा लेप, पोलिसांचा अजब उपाय

सुरक्षेसाठी चौकीत येणाऱ्यांवर गंगाजल-चंदनाचा लेप, पोलिसांचा अजब उपाय

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातील (Meerut District) एका पोलीस ठाण्यातदेखील एक अजब उपाय राबवण्यात येत आहे. इथे चक्क पोलीस चौकीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंगाजल (Gangajal) आणि चंदनाचा लेप (Chandan) लावला जात आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातील (Meerut District) एका पोलीस ठाण्यातदेखील एक अजब उपाय राबवण्यात येत आहे. इथे चक्क पोलीस चौकीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंगाजल (Gangajal) आणि चंदनाचा लेप (Chandan) लावला जात आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातील (Meerut District) एका पोलीस ठाण्यातदेखील एक अजब उपाय राबवण्यात येत आहे. इथे चक्क पोलीस चौकीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंगाजल (Gangajal) आणि चंदनाचा लेप (Chandan) लावला जात आहे.

  मेरठ, 30 मार्च :  सध्या कोरोना विषाणूच्या साथीनं सगळ्यांना इतकं घाबरवलं आहे की, कोरोनापासून वाचण्यासाठी कोणताही सारासार विचार न करता सुचतील ते उपाय केले जात आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठ जिल्ह्यातील (Meerut District) एका पोलीस ठाण्यातदेखील एक अजब उपाय राबवण्यात येत आहे. इथे चक्क पोलीस चौकीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंगाजल (Gangajal) आणि चंदनाचा लेप (Chandan) लावला जात आहे. या पोलीस ठाण्यात कोरोनासाठी पाळण्यात येणाऱ्या सुरक्षा नियमांमध्येही (Safety Protocols) याचा समावेश करण्यात आला आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  नौचंडी पोलिस ठाण्याचे (Nauchandi Police Station) एसएचओ(SHO) प्रेमचंद शर्मा यांनी हे नियम तयार केले आहेत. पत्रकार पीयूष राय (Piyush Rai) यांनी तिथला व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये एसएचओ शर्मा पोलिस ठाण्यात गंगाजलाची बाटली घेऊन प्रवेश करताना दिसतात. त्यानंतर गंगाजलच्या अनेक बाटल्या त्यांच्या टेबलवर ठेवल्या जात असल्याचे दिसते. नंतर इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गंगाजल शिंपडून चंदनाचा टिळा लावला जातो, तसंच अनेकांना गंगाजलाची बाटली भेट दिली जात असल्याचंही या व्हिडिओत दिसते.

  एसएचओ शर्मा हे पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीचं शुद्धीकरण (Purification) करण्यासाठी गंगाजल वापरतात; गंगाजल शिंपडत असताना ते एक मंत्र म्हणतात, असं राय यांनी म्हटलं आहे. तर एसएचओ शर्मा यांनी येणाऱ्या लोकांना शांत करण्याच्या उद्देशानं हा उपाय करत असल्याचं म्हटलं आहे. गंगाजल आणि चंदन वापरण्यास सुरुवात केल्यापासून स्टेशनवर येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, लोक शांतपणे त्यांच्या समस्या मांडत असल्याचं दिसून आलं आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असा दावा शर्मा यांनी केला आहे.

  उत्तर प्रदेशातील पोलिस (UP Police) अशा अजब कार्यपद्धतीमुळं चर्चेचा विषय बनत आहेत. काही दिवसांपूर्वीच जप्त करण्यात आलेली 1400 पेक्षा जास्त दारूची कार्टन्स (Liquor Cartons) कोतवाली देहात पोलीस ठाण्यातूनच बेपत्ता झाली होती. पोलीस ठाण्यातील डायरीत चक्क उंदरांनी (Rats) 239 कार्टन्स कुरतडल्यानं ती खराब झाल्याची नोंद करण्यात आली होती. यात काहीतरी घोटाळा असल्याची शंका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्यानंतर इटाहचे पोलिस महाअधीक्षक उदय शंकर सिंग यांनी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी या पोलीस ठाण्याचे अधिकारी इंद्रेशपाल सिंग आणि लिपिक रिशल सिंग यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं दिली.

  First published:

  Tags: Corona, Police, Uttar pradesh