उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

उद्धव ठाकरे यांच्या याच दौऱ्याबाबत मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची लखनऊत भेट घेणार आहेत.

  • Share this:

सागर कुलकर्णी, महू (मध्यप्रदेश)ता. 19 नोव्हेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या रविवारी (25 नोव्हेंबर) अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी शिवसेनेनं सुरू केलीय. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांचा हा अयोध्या दौरा असल्याच बोललं जातंय. उद्धव यांच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच न्यूज18 लोकमतकडे प्रतिक्रीया व्यक्त केलीय. भगवान राम हे सर्वांचे आहेत, त्यामुळे अयोध्येत कुणीही येवू शकत अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केलीय.


उद्धव ठाकरे यांच्या याच दौऱ्याबाबत मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची लखनऊत भेट घेणार आहेत.


अयोध्येत काय चाललंय?


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाहीर सभा घेताहेत तर त्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत धर्म धर्मसभेचं आयोजन केलं असून शिवसेनेपेक्षा ही सभा मोठी व्हावी यासाठी संघ परिवाराने आपली पूर्ण शक्ती पणाला लावलीय.


राम मंदिर बांधणं होत नसेल तर सांगा, आम्ही बांधतो असं थेट आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला आणि भाजपला कोंडीत पकडलं. अयोध्येत शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेना आणि भाजपचे संबंध सध्या ताणलेले असल्यानं शिवसेनेची ही कृती भाजपला आव्हान समजलं जातं.


याला उत्तर देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं त्याच दिवशी अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केलंय. त्यासाठी जोरदार वातावरण निर्मिती उत्तरप्रदेशात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि अभाविप या संघपरिवारातल्या सर्व संघटना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटत आहेत.


 


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 09:35 PM IST

ताज्या बातम्या