मरण्यासाठीच आलात, तर जिवंत कसे राहाल; CAA आंदोलकांविरुद्ध आदित्यनाथांचं धक्कादायक वक्तव्य

मरण्यासाठीच आलात, तर जिवंत कसे राहाल; CAA आंदोलकांविरुद्ध आदित्यनाथांचं धक्कादायक वक्तव्य

CAA विरुद्ध हिंसक आंदोलन करणाऱ्यांचं CCTV फुटेज बघून त्यांच्या विरुद्ध राज्य सरकारने कडक करावाई सुरु केली होती.

  • Share this:

लखनऊ 20 फेब्रुवारी : CAA विरुद्ध आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. उत्तर प्रदेशात CAA आंदोलकांविरुद्ध राज्य सरकारने कडक कारवाई केलीय. दंगलखोरांना सोडणार नाही असंही आदित्यनाथ यांनी म्हटलंय. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे ठिणगी पडलीय. आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र हिंसाचार करता कामा नये अशा लोकांची संपत्तीही जप्त केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. काही ठिकाणी गोळीबार झाल्याने योगी सरकारवर टीका करण्यात येत होती.

आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केलीय. योगी आदित्यनाथ हे जनरल डायरसारखे वागत आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलीय. लोकशाहीत अशा प्रकारची वक्तव्य कधीच मान्य केली जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले.

CAA विरुद्ध हिंसक आंदोलन करणाऱ्यांचं CCTV फुटेज बघून त्यांच्या विरुद्ध राज्य सरकारने कडक करावाई सुरु केली होती. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांविरुद्ध त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुद्धा सरकारने केली होती.

लिंगायत मठाधिपतीपदी प्रथमच मुस्लीम मुल्ला; बसवेश्वरांचे आहेत भक्त

उत्तर प्रदेशातल्या अनेक शहरांमध्ये CAA विरुद्ध निदर्शने झाली होती. त्यातल्या अनेक प्रदर्शनांना हिंसक वळणही लागलं होतं. त्यात सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं. समाजवादी पक्षानेही योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर टीका केलीय. त्याचं वक्तव्य हे हुकूमशाही प्रवृत्तीचं आणि तेढ निर्माण करणार ंआहे असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा...

VIDEO : 500 रुपये चोरल्याचा आरोप, दोन दलित तरुणांना बांधून पट्ट्याने झोडपलं

निर्भया प्रकरण: आरोपी विनयने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला केलं जखमी

First published: February 20, 2020, 3:34 PM IST

ताज्या बातम्या