Home /News /national /

‘महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा समुळ नाश करणार’ हाथरसच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्री योगींची गर्जना

‘महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा समुळ नाश करणार’ हाथरसच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्री योगींची गर्जना

घटना घडलेल्या गावातले सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून सुरक्षा वाढवली आहे. गावात कुणालाही प्रवेश करू दिला जात नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी रोखून धरल्याने वाद निर्माण झाला होता.

    लखनऊ 02 ऑक्टोबर: उत्तर प्रदेश मधल्या हाथरस अत्याचार प्रकरणानंतर उत्तर प्रदेश सरकारवर देशभरातून टीका होत आहे. ज्या प्रकारे राज्य सरकारने हे प्रकरण हाताळले त्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. राज्य सरकारवर दबाव वाढल्याने मुख्यमंत्री योगी यांनी घोषणा करत आरोपींना कडक शिक्षा देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात आई-बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा विचारही करणाऱ्यांचा समुळ नाश निश्चित आहे. अशा लोकांना अशी कडक शिक्षा करू की त्यामुळे धाक निर्माण होईल. ही फक्त घोषणा नाही तर आमचं वचन आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, घटना घडलेल्या गावातले सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून सुरक्षा वाढवली आहे. गावात कुणालाही प्रवेश करू दिला जात नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी रोखून धरल्याने वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर प्रशासनाच्या व्यवहारामुळे देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेता राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह 123 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल व प्रियांका गांधी यांच्याविरोधात 48 पानी एफआयआऱ दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हाथरस जात असताना नियमांचं उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन राग व्यक्त केला आहे. आज महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांनी काही ओळी शेअर केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करीत तिला अत्यंत क्रुरपणे जीवे मारण्यात आलं. यानंतर देशभरातून उत्तर प्रदेश पोलिसांविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. दरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते हाथरस येथे पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात अडविण्यात आलं. हाथरस येथे 144 जमावबंदी लागू करण्यात आल्याने पुढे जाता येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी एकटे जातील अशी विनंती केल्यानंतरही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर धक्काबुक्की केल्याने वाद निर्माण झाला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Uttar pardesh, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या