लग्नानंतर तीनच महिन्यात 'तलाक' आणि नंतर केला सामूहिक बलात्कार

लग्नानंतर तीनच महिन्यात 'तलाक' आणि नंतर केला सामूहिक बलात्कार

बलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल्यास पती विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.

  • Share this:

बुलंदशहर, 3 जुलै : तिहेरी तलाकवर देशभर चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातल्या एका धक्कादायक बातमीने राज्य हादरलं आहे. बुलंदशहरमधल्या एका महिलेला लग्नाच्या तीनच महिन्यानंतर नवऱ्याने तलाक दिला आणि नंतर त्याच्या तीन भावांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेनं केलीय. अगदी शुल्लक कारणांवरून नवऱ्याने तलाक दिल्याची तक्रार पीडित महिलेनं केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमधलं हे प्रकरण आहे. पीडित महिलेचं सलमान या तरुणीशी तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. एकदा अगदी शुल्लक कारणांवरून नवरा आणि बायकोमध्ये भांडण झालं. भांडणानंतर नवऱ्याने तलाक-तलाक-तलाक म्हणत तिला घटस्फोट दिला. एवढच करून तो थांबला नाही तर त्याच्या तीन भावांनी मिळून तिच्यावर बलात्कारही केला अशी तक्रार महिलेने पोलिसांमध्ये केली आहे.

बुलंदशहर पोलिसांनी सलमान विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस चौकशी करत आहेत. बलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल्यास पती विरुद्ध  कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.

VIDEO : भांडुपमध्ये इंडस्ट्रियल इस्टेटला मोठी आग

तिहेरी तलाकला मिळणार मंजूरी

तिहेरी तलाक विधेयक हे मोदी सरकारसाठी महत्त्वाचं आहे. या विधेयकाच्या मंजुरीसाठी मोदी सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत होतं. पण, आता मोदी सरकारच्या या प्रयत्नांना यश येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण, लोकसभेत बहुमताच्या जोरादार विधेयक संमत झाल्यानंतर राज्यसभेची मंजुरी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. पण, राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी असल्यानं सरकारच्या या प्रयत्नांना यश येत नव्हतं. पण, आता मात्र सरकारचा हा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, मित्र पक्षाच्या मदतीनं भाजप आता राज्यसभेत देखील तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी मिळवू शकतं.

धक्कादायक! ड्रेनेजमध्ये सापडली 300 डेबिट कार्ड, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

तर, विरोध करण्याऐवढं काँग्रेसचं संख्याबळ मात्र नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारचं महत्त्वकांक्षी असं तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत संमत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.

नुकतंच भाजपनं TDPचे 4 आणि INLDच्या एक खासदाराला पक्षात सामील करून घेतलं. त्यामुळे भाजपचं राज्यसभेतील संख्याबळ हे 75 झालं आहे. शिवाय, गुजरातमधून देखील 2 जागा या भाजप राज्यसभेवर पाठवणार आहे. त्यामुळे संख्याबळात दोननं भर पडून ती 77 होणार आहे.

First published: July 3, 2019, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading