News18 Lokmat

अयोध्येत दिवाळीसाठी आणि बरसानात होळीसाठी योगी सरकारची खैरात

गेल्या वर्षी दिवाळीचा सण शाही इतमामात अयोध्येत साजरा करण्यात आला होता. या दिवाळीत मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यात आले होते. एकूण 1.75 लाख दिव्यांनी सगळी अयोध्या नगरी उजळून निघाली होती. तर राम आणि सीता हेलिकॉप्टरमधून अयोध्येत उतरले होते

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2018 06:03 PM IST

अयोध्येत दिवाळीसाठी आणि बरसानात होळीसाठी योगी सरकारची खैरात

16 फेब्रुवारी:  उत्तर प्रदेश सरकारचं वार्षिक बजेट आज जाहीर करण्यात आलं आहे. या बजेटमध्ये अयोध्येत साजऱ्या होणाऱ्या दिवाळीसाठी तर बरसाना या राधा-कृष्णाच्या तीर्थक्षेत्रावर होणाऱ्या होळीसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी दिवाळीचा सण शाही इतमामात अयोध्येत साजरा करण्यात आला होता. या दिवाळीत मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यात आले होते. एकूण 1.75 लाख दिव्यांनी सगळी अयोध्या नगरी उजळून निघाली होती. तर राम  आणि सीता हेलिकॉप्टरमधून अयोध्येत उतरले होते. या साऱ्यावर खूपच खर्च झाला होता.हा खर्च राज्य सरकारने केल्यामुळे त्यावर प्रचंड टीकाही करण्यात आली होती. पण  आता यासाठी विशेष निधीची तरतूदच करण्यात आली आहे. या बजेटमध्ये 44 हजार 53 कोटी  32 लाखाचं नुकसान उठवावं लागणार आहे.तसंच नद्या सफाई, कालवे ,पर्यटन या विषयांनाही महत्त्व देण्यात आलं आहे . हे वित्तीय अनुशासन असलेलं बजेट आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या  ,स्त्रीयांचे प्रश्न,आरोग्य असे अनेक प्रश्न असताना दिवाळी आणि होळीच्या सणांसाठी जेव्हा स्वतंत्र निधी तयार करण्यात येत  आहे हे उत्तर प्रदेशच्या नागरिकांना पटतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...