VIDEO : 'मुस्लिमांकडून भाजी घेऊ नका कारण...', भाजप आमदारानं लोकांना केलं आवाहन

VIDEO : 'मुस्लिमांकडून भाजी घेऊ नका कारण...', भाजप आमदारानं लोकांना केलं आवाहन

एकीकडे सरकार आणि वैद्यकिय कर्मचारी या जैविव समस्येशी दोन हात करत आहेत, तर दुसरीकडे मात्र राजकारणी मंडळी अशा परिस्थितही बेताल वक्तव्य करत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्या 28 हजारहून अधिक झाली आहे. एकीकडे सरकार आणि वैद्यकिय कर्मचारी या जैविव समस्येशी दोन हात करत आहेत, तर दुसरीकडे मात्र राजकारणी मंडळी अशा परिस्थितही बेताल वक्तव्य करत आहेत. अशाच एक भाजप आमदारानं लोकांना मुस्लिम विक्रेत्यांकडून भाजी खेरदी करू नका, असे सांगितले आहे. यामुळं सर्व स्थरातून या भाजप आमदारांवर टीका केली जात आहे.

या आमदाराचं नाव सुरेश तिवारी असून, त्यांनी मुस्लिम विक्रते भाज्यांना थुंकी लावत असल्याचे सांगत लोकांना हे आवाहन केले आहे. देओरिया जिल्ह्यातील लोकांना सुरेश तिवारी यांनी, "एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जाहीरपणे सांगतो. कोणीही मियॉंकडून (मुस्लिम) भाज्या खरेदी करणार नाही", असे सांगितले. दरम्यान बारहाज मतदार संघातील प्रतिनिधी असलेल्या तिवारी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं सुरेश तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मी हे वक्तव्य गेल्या आठवड्यात केले होते, असे सांगितले. दरम्यान सुरेश तिवारी यांच्या या व्हिडीओमध्ये अनेक सरकारी अधिकारीही दिसत आहेत.

वाचा-माणुसकी मेली? पोलिसाला धडक देऊन 'तो' थांबला नाही; बारामतीत घडली घटना

वाचा-'चीन कोरोनाला पसरण्यापासून रोखू शकत होता पण...', ट्रम्प यांनी दिले चौकशीचे आदेश

सुरेश तिवारी यांनी असेही सांगितले की, कोरोनाचा प्रसार करण्यासाठी हे भाजीवाले भाज्यांना थुंकी लावत असल्याचे कळले म्हणून मी नागरिकांना असे आवाहन केले. एवढंच नाही तर ही माझी भुमिका आहे, लोकांना यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे असेही आमदार म्हणाले. तर, आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देताना त्यांना दिल्लीतील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाचा संदर्भ दिला. दरम्यान सुरेश तिवारी यांच्या वक्तव्यावर भाजपचे राज्यस्तरीय प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी या वक्तव्याचे पक्ष समर्थन करत नाही, असे सांगितले.

वाचा-...तर येत्या 24 तासांत होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य

दरम्यान, याआधी काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथे एक व्यक्तीनं सामना डिलिव्हरी करणारा मुलगा मुस्लिम असल्यामुळं सामना घेण्यास नकार दिला होता. या इसमाविरुद्ध पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. मात्र सुरेश तिवारी यांच्या या बेताल वक्तव्यावर अद्याप पक्षानं किंवा शासनानं कारवाई केल्याचे वृत्त नाही आहे.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 28, 2020, 10:10 AM IST

ताज्या बातम्या