Home /News /national /

UP Assembly Elections: BJP मध्ये प्रवेश केल्यानंतर सून अपर्णा यांनी घेतले सासरे मुलायम सिंह यांचे आशीर्वाद

UP Assembly Elections: BJP मध्ये प्रवेश केल्यानंतर सून अपर्णा यांनी घेतले सासरे मुलायम सिंह यांचे आशीर्वाद

UP Assembly Elections: अपर्णा यादव यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. समाजवादी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लखनऊच्या कॅन्ट मतदारसंघातून भाजप अपर्णा यादव यांना तिकीट देऊ शकते.

    उत्तर प्रदेश, 21 जानेवारी: भाजपचे (BJP) सदस्यत्व घेतल्यानंतर अपर्णा यादव (Aparna Yadav) यांनी लखनऊला पोहोचून सासरे मुलायम सिंह यादव यांचे आशीर्वाद घेतले. अपर्णा यांनी मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचा आशीर्वाद घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अपर्णा यादव यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. समाजवादी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लखनऊच्या कॅन्ट मतदारसंघातून भाजप अपर्णा यादव यांना तिकीट देऊ शकते, असे मानले जात आहे. कारण अपर्णा यांनी 2017 मध्ये तेथून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. ठाणे: जिवंत महिलेच्या किडनीचा केला सौदा, नेपाळच्या गायिकेनं घातला कोट्यवधींचा गंडा राज्यात निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासूनच अपर्णा यादव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्याचवेळी तीन दिवसांपूर्वी सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, समाजवादी परिवारात सर्व काही ठीक चालले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करत अखिलेश यादव यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. दुसरीकडे अपर्णा यांच्या माध्यमातून मुलायम सिंह कुटुंबात भाजपला मोठा धक्का बसला. दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली. अपर्णा यादव यांचे ट्विट मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी ट्विट केले की, 'भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व घेतल्यानंतर लखनऊला आल्यावर वडील/नेताजींचे आशीर्वाद घेतले.' अपर्णा यादव यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अपर्णा यादव लखनऊला परत आल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अपर्णा यादव यांनी ट्विट केलं की, भाजपचे सदस्यत्व घेतल्यानंतर, दिल्लीहून लखनऊ अमौसी विमानतळावर पोहोचल्यावर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी माझे जोरदार स्वागत केले, इतक्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते, तुम्ही सर्वांनी माझा आदर वाढवला आणि प्रोत्साहन दिले. पंतप्रधान मोदींच्या धोरणांचा प्रभाव त्याचवेळी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव म्हणाल्या की, माझ्यावर नेहमीच पंतप्रधान मोदींचा प्रभाव आहे आणि देश माझ्यासाठी प्रथम आहे. मी देशाची सेवा करण्यासाठी आणि सर्वांचे सहकार्य घेण्यासाठी आली आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना अपर्णाने पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियान, महिला योजना आणि रोजगारासाठीच्या मोहिमेचं कौतुक केलं. जाणून घ्या कोण आहे अपर्णा यादव अपर्णा यादव या मुलायम सिंह यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत आणि लखनऊच्या कँट मतदारसंघातून 2017 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अपर्णा यांना कँटमधून सुमारे 63 हजार मते मिळाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Election, Uttar pradesh news

    पुढील बातम्या