मराठी बातम्या /बातम्या /देश /UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? नरेंद्र मोदी घेणार आज निर्णय

UP Assembly Election 2022: योगी आदित्यनाथ कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार? नरेंद्र मोदी घेणार आज निर्णय

UP Assembly Election 2022: उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. पण कुठल्या मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये.

UP Assembly Election 2022: उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. पण कुठल्या मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये.

UP Assembly Election 2022: उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. पण कुठल्या मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये.

नवी दिल्ली, 13 जानेवारी : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) हे पहिल्यांदा विधानसभा निवडणूक (Assembly Election 2022) लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी कुठून विधानसभा लढवावी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत निर्णय होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ हे आयोध्या विधानसभा मतदारसंघातून (Ayodhya Assembly Constituency) निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून सुरु होणाऱ्या बैठकीत उत्तर प्रदेशातील पहिल्या तीन टप्प्यांच्या उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये कोअर ग्रुपची बैठक पार पडली. जवळपास बारा तासापेक्षा जास्त दोन्ही दिवस बैठकी झाल्या. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित होते. बैठकीच्या दरम्यान उत्तरप्रदेश सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या बैठकीवर काहीसा परिणाम जाणवला. मात्र भाजपाचे तिन्ही ज्येष्ठ नेते यामध्ये भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यातील राजकीय हालचालीवर हस्तक्षेप करत राजीनामा सत्र थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाचा : मोदी लाट ओसरली? महिन्याभरात एक-दोन नाही तर तब्बल 13 नेत्यांचा भाजपला रामराम

उत्तरप्रदेशमध्ये होणार असलेली विधानसभा निवडणूक ही सात टप्प्यात होत आहे. प्रत्येक टप्प्यासाठी वेगळी रणनीती आखायची असा काहीचा निर्णय दोन कोअर ग्रुपच्या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. योगी आदित्यनाथ हे पूर्वी लोकसभा खासदार होते मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भरघोस मतदान घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या नावावर ती शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यावेळी योगी आदित्यनाथ हे विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र आता या विधानसभा निवडणुकीमध्ये मथुरा आणि आयोध्या या दोन मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगी आदित्यनाथ यांच्या विधानसभा मतदारसंघाचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ही हायब्रीड मोडच्या माध्यमातून होणार आहे. यामागे कारण असे आहे की, भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते हे कोरोना बाधित आहेत. त्यातही निवडणूक समितीचे सदस्य राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि खुद्द भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे ही बैठक हायब्रीड मोड पद्धतीने होणार आहे.

First published:
top videos

    Tags: Election, Narendra modi, Uttar pradesh, Yogi Aadityanath