श्रीनगर, 23 ऑक्टोबर : करीब तब्बल 14 महिन्यांच्या अटकेनंतर सुटका झालेल्या जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेता महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti, PDP) यांनी केंद्र सरकारवर अनेक आरोप लावले आहेत. एका पत्रकार परिषदेदरम्यान त्या हातात जम्मू-कश्मीरचा झेंडा दाखवित म्हणाल्या, माझा झेंडा हा आहे. जेव्हा हा झेंडा परत मिळेल तेव्हा तिरंगाही फडकवणार. आमचा झेंडाच तिरंग्यासह आमचे संबंध प्रस्थापित करतो.
माध्यमांशी बोलताना महबुबा मुक्ती पुढे म्हणाल्या, आपण आर्थिकदृष्ट्या बांग्लादेशाहून मागे पडलो आहोत. मग तो रोजगाराचा मुद्दा असो वा दुसरं काही..प्रत्येक ठिकाणी सरकार अपयशी ठरली आहे. या सरकारने असं काम केलंच नाही जे दाखवून ते मत घेऊ शकतील. हे लोक म्हणतात आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली जाऊ शकते. त्यानंतर म्हणतात फ्री कोरोना लस वाटणार..आज पंतप्रधान मोदींना मतांसाठी अनुच्छेद 370 वर बोलण्याची गरज पडली आहे.
हे ही वाचा-'NDA ला विरोध करणारे देशविरोधी'; निवडणूक रॅलीमध्ये मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
Mehbooba Mufti, PDP: It's a fact that China captured 1000 sq km of our land. I think we somehow managed to get back around 40 km. China speaks of Article 370 too. They say it's disputed & ask why was J&K made UT? J&K came into international view like never before after abrogation pic.twitter.com/lVIuORD9Fq
— ANI (@ANI) October 23, 2020
चीनबाबत महबुबा मुक्ती म्हणाल्या की, हे सत्य आहे की चीनने आपल्या 1000 स्क्वेअप किमी जमिनीवर कब्जा केला. मला वाटतं आपण कसंतरी 40 किमी जमीन परत घेण्यास यशस्वी झालो आहे. चीन हा अनुच्छेद 370 आणि जम्मू-काश्मीरबाबत बोलतात. काश्मीरला संघराज्य प्रदेश का बनविण्यात आलं, असा प्रश्न चीनकडून विचारला जात आहे. अनुच्छेद 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जितकी चर्चा झाली तितकी केव्हाच झाली नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.