'उन्नाव' पुन्हा पेटलं? बलात्कार प्रकरणातील पीडितेला नराधमांनी जिवंत पेटवले

'उन्नाव' पुन्हा पेटलं? बलात्कार प्रकरणातील पीडितेला नराधमांनी जिवंत पेटवले

जामिनावर तुरूंगातून बाहेर नराधमांनी पीडितेला जिवंत पेटवले.

  • Share this:

लखनऊ,5 डिसेंबर:हैदराबादेत तरुण डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना ताजी असताना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे जामिनावर तुरूंगातून बाहेर नराधमांनी पीडितेला गुरुवारी सकाळी जिवंत पेटवले. पीडिता 90 टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला तातडीने उपचारासाठी लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे उन्नाव पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंदुनगर पोलिस स्टेशन परिसरात गुरूवारी सकाळी ही घटना आहे. पीडिता बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी रायबरेली कोर्टात जात होती. रेल्वे पकडण्यासाठी ती पायी निघाली होती. तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला अडवले. तिला काही समजण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात पीडिता गंभीर भाजली गेली आहे. पीडितेने दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान शुभम आणि शिवम बलात्कार प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते.

डिसेंबर 2018 मध्ये झाला होता सामुहिक बलात्कार..

दरम्यान, 12 डिसेंबर 2018 रोजी शिवम आणि त्याचा मित्र शुभम त्रिवेदी लग्न करण्याच्या बहाण्याने मंदिरात घेऊन पीडितेवर सामुहिक बलात्कार केला होता. बिहार पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी शिवम आणि शुभम त्रिवेदला अटक करून तुरुंगात डांबले होते.

शिवमसोबत होते प्रेमसंबंध..

पीडितेचे गावातील शिवम त्रिवेदी याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. शिवमने रायबरेली येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने रायबरेली येथे एका खोली बंद केले होते.

महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला..

दरम्यान, हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतरचे सावली मालदामध्ये (पश्चिम बंगाल) याच प्रकारची घटना समोर आली आहे. मालदा येथील इंग्लिश बाजार पोलिस ठाण्यांतर्गत कोतवालीमध्ये चकल्यात 20-21 वर्षांच्या महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. पीडितेची ओळख अद्याप समजू शकली नाही.

मृतदेहाच्या अवस्थेतून पीडितेवर बलात्कार केला गेला असावा. पुरावे नष्ट करण्यासाठी तिला जिवंत जाळण्यात आले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले असून या परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 02:26 PM IST

ताज्या बातम्या