Home /News /national /

Unnao Rape Case: गरज असेल तरच घराबाहेर पडा; उन्नाव बलात्कार पीडितेला कोर्टाचे निर्देश

Unnao Rape Case: गरज असेल तरच घराबाहेर पडा; उन्नाव बलात्कार पीडितेला कोर्टाचे निर्देश

उन्नाव बलात्कार प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायालयानं सोमवारी एक मोठा निर्देश दिला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायालयानं सोमवारी एक मोठा निर्देश दिला आहे.

Unnao Rape Case: उन्नाव बलात्कार प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायालयानं सोमवारी एक मोठा निर्देश दिला आहे.

    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: उन्नाव बलात्कार प्रकरणात (Unnao Rape Case) सुनावणी करणाऱ्या न्यायालयानं सोमवारी एक मोठा निर्देश दिला आहे. न्यायालयानं बलात्कार पीडितेला सुनावणी पूर्ण होईपर्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर जावं, तसेच कुठेही जाण्यापूर्वी तिच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी, असा आदेश दिला आहे. उन्नाव बलात्कार पीडितेला सीआरपीएफचं (CRPF) संरक्षण मिळालं आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा (Justice Dharmesh Sharma) यांनी हे निर्देश दिले आहेत. खरंतर, वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप करत उन्नाव बलात्कार पीडितेनं न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यानंतर न्यायालयानं हे निर्देश जारी केले आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा म्हणाले की, ' पीडितेनं कुठेही जाण्यापूर्वी सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. ते तुमच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच दररोज घराबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, अशाप्रकारचं नियोजन आपण करावं. गरज असेल तेव्हाच बाहेर जावा. तसेच ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत सावध राहा, असंही न्यायाधिशांनी म्हटलं आहे. हेही वाचा-15 वर्षांपूर्वी झाले होते मुस्लीम, 18 जण परतले हिंदू धर्मात उन्नाव बलात्कार पीडित आणि सुरक्षा अधिकारी सहमत या व्यतिरिक्त, न्यायालयानं म्हटलं आहे की बलात्कार पीडित आणि तिचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी हे प्रकरण सामंजस्यानं सोडवण्यास सहमत झाले आहेत. त्याचवेळी न्यायालयाने म्हटले की, जर पीडित किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना संबंधित प्रकरणांसाठी आपल्या वकीलाला भेटायचं असेल तर त्यांनी एक दिवस अगोदर याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. हेही वाचा-उच्चाधिकारी लेकीला पाहून इन्स्पेक्टर बापाचं उर आलं भरून; सॅल्युट मारतानाचा PHOTO उन्नाव बलात्कार प्रकरणातील भाजपचा बडतर्फ आमदार कुलदीप सिंह सेंगर सध्या तुरुंगात आहे. त्यानं 2017 मध्ये पीडित मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता आणि पीडित मुलगी त्यावेळी अल्पवयीन होती. याप्रकरणी न्यायालयानं 20 डिसेंबर 2019 रोजी सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय, 2019 मध्ये कोर्टानं सीआरपीएफला बलात्कार पीडित मुलगी, तिची आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश दिले होते. उन्नाव बलात्कार प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातून भाजपवर टीका करण्यात आली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Court, Delhi, Rape, Uttar pradesh

    पुढील बातम्या