BREAKING NEWS: उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

BREAKING NEWS: उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण; पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेवर सुरू होते उपचार.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 डिसेंबर: उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेची मृत्यूसोबत झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री 11.40 वाजता सफदरजंग रुग्णालयात पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. (safdarjung hospital)सफदरजंग रुग्णालयात पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या मोठ्या बहिणीने दिली आहे. शुक्रवारी रात्री 11.10 वाजता पीडितेचं हृदय काम करत नसल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर डॉक्टरांनी पीडितेला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले मात्र पीडितेची झुंज अपयशी ठरली. डॉ. शलभ कुमार यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे.

90 टक्के जळूनही पीडितेनं धीर सोडला नव्हता. 'उपचारादरम्यान मी वाचेन ना मला जगायचं आहे.' असा जप पीडित तरुणी सातत्यानं करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर गुरुवारी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुरुवारी रात्री 9 वाजता ती शुद्धीत होती त्यावेळी आपल्या भावाकडून तिने आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी त्यांना सोडू नको असं वचन घेतलं होतं. त्यानंतर पीडित महिलेची प्रकृती अधिक खालवल्यानं तिला वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा पीडितेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. न्यायाची लढाई लढत असताना आणखी एक निर्भयाची मृत्यूसोबतची लढाई मात्र अपयशी ठरली.

वाचा-हैदराबाद ENCOUNTER विरुद्ध याचिका, 9 तारखेपर्यंत आरोपींवर अंत्यसंस्कार नाहीत

उत्तर प्रदेशातील उन्नाव इथे जामिनावर तुरूंगातून बाहेर सुटलेल्या नराधमांनी पीडितेला गुरुवारी सकाळी जिवंत पेटवले. पीडिता 90 टक्के भाजली होती. तिला उपचारासाठी तातडीने लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केलं असल्याची माहिती मिळत आहे. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तीन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंदुनगर पोलिस स्टेशन परिसरात गुरूवारी सकाळी ही घटना आहे. पीडिता बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी रायबरेली कोर्टात जात होती. रेल्वे पकडण्यासाठी ती पायी निघाली होती. तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला अडवले. तिला काही समजण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात पीडिता गंभीर भाजली होती. पीडितेने दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांनी अटक केली आहे.

वाचा-पॉर्न साइट्समुळे तरुण बिघडतात, केंद्राने बंदी घालावी; नितीश कुमारांचा अजब दावा

काय आहे उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण?

दरम्यान, 12 डिसेंबर 2018 रोजी शिवम आणि त्याचा मित्र शुभम त्रिवेदी लग्न करण्याच्या बहाण्याने मंदिरात घेऊन पीडितेवर सामुहिक बलात्कार केला होता. बिहार पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी शिवम आणि शुभम त्रिवेदला अटक करून तुरुंगात डांबलं होते.

शिवमसोबत होते प्रेमसंबंध

पीडितेचे गावातील शिवम त्रिवेदी याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. शिवमने रायबरेली येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने रायबरेली येथे एका खोली बंद केलं होते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 07:08 AM IST

ताज्या बातम्या