मराठी बातम्या /बातम्या /देश /

उन्नाव बलात्कार प्रकरणात आमदार कुलदीप सिंग सेंगरला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

उन्नाव बलात्कार प्रकरणात आमदार कुलदीप सिंग सेंगरला कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

दिल्लीच्या (Delhi) तीसहजारी कोर्टाने (Tis Hazari Court) त्यांच्या निर्णयात दोषी सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दिल्लीच्या (Delhi) तीसहजारी कोर्टाने (Tis Hazari Court) त्यांच्या निर्णयात दोषी सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दिल्लीच्या (Delhi) तीसहजारी कोर्टाने (Tis Hazari Court) त्यांच्या निर्णयात दोषी सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : उन्नाव बलात्कार प्रकरणात (Unnao Rape Case)दोषी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर (MLA Kuldeep Sengar) या जन्मठेपेची (Life Imprisonment)शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या (Delhi) तीसहजारी कोर्टाने (Tis Hazari Court) त्यांच्या निर्णयात दोषी सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच बरोबर आरोपी सेंगरने पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रुपये मोबदला देण्याचा आदेश देण्यात आला आहे. याआधी शुक्रवारी सकाळी सुनावणी करण्यात आली होती. तेव्हा न्यायाधीशांनी कुलदीप सेंगर यांना लॉकअपमधून आणण्यास सांगितलं. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्याचवेळी बचाव पक्षाच्या वकिलाने पुन्हा सांगितले की,  कुलदीप सेंगरला दोन मुली आणि एक पत्नी आहे. सेंगरवर सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून, शिक्षा देताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे असं वकिलाने सांगितलं होतं.

उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झाला होतं. उन्नाव इथे जून 2018मध्ये एका महिलेवर  बलात्कार करण्यात आला होता. हा बलात्कार कुलदीप सिंग सेंगरने आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणाचे पोलिसांकडे सर्व पुरावे असतानाही अटक करण्यास टाळाटाळ केली गेली. अखेर अलाहाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर सेंगरला अटक केली होती

या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेत सर्व खटल्यांची सुनावणी राजधानी दिल्लीत हलवली होती. आतापर्यंतची झालेली तपासणी आणि पीडितेच्या अपघाताचा चौकशी अहवाल सोपवावा असे आदेश कोर्टानं सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

पीडीतेला जिवंत जाळलं होतं.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे जामिनावर तुरूंगातून बाहेर नराधमांनी पीडितेला 5 डिसेंबरला सकाळी जिवंत पेटवलं होतं. 90 टक्के भाजल्या पीडितेचा अखेर तिचा मृत्यू झाला. तिला तातडीने उपचारासाठी लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केलं होतं. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली.

First published:

Tags: Delhi news, Unnao gangrape