S M L

उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सेंगरला सीबीआयने घेतलं ताब्यात

उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात अखेर अटक झाली आहे. भाजप आमदार कुलदिप सिंह सेंगरला सीबीआयनं अटक केलीये.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 13, 2018 06:02 PM IST

उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सेंगरला सीबीआयने घेतलं ताब्यात

13 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात अखेर अटक झाली आहे. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयनं अटक केलीये. सेंगरला पहाटे साडे चार वाजता त्याच्या लखनऊच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. सध्या त्याला चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात नेण्यात आलं आहे.

सेंगरवर पॉक्सोसह अनेक कायद्यांअतर्गत गुन्हे दाखल आहेत. पण अद्याप त्याला अटक होत नव्हती. त्यानंतर काल रात्री या प्रकरणावरून काँग्रेसनं गेट वे ऑफ इडियावर भाजप सरकारविरोधात मार्च काढला. देशभरातून टीकेची झोड उठल्यावर उत्तर प्रदेश सरकारनं गुरुवारी संध्याकाळी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केलं. त्यानंतर तातडीने या प्रकरणा संबंधीत सगळी कागदपत्र दिल्लीला पाठवण्यात आली आणि काही तासांत सेंगरला अटक झाली.

जून २०१७ मध्ये आमदार आणि त्यांच्या भावांनी बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. ८ एप्रिल रोजी प्रकरणाचा योग्य तपास केला जात नसल्याचा आरोप करत तरुणीन योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसदेखील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप तिने केला. धक्कादायक म्हणजे रविवारी पीडित तरुणीच्या वडिलांना अटक करण्यात आली. सोमवारी पोलीस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला.



दरम्यान, कुलदीप सेंगरवर पॉक्सोसारखे गुन्हे दाखल असताना उत्तर प्रदेशचे पोलीस मात्र सिंगरला माननीय म्हणून त्याचा आदर-सन्मान करतात. या सगळ्यामुळे माणुसकीचा तर गळा दाबलाच आहे पण आपल्या वर्दीचं महत्त्व ही हे पोलीस विसरले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 07:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close