उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार दोषी

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार दोषी

यात आरोपी हा भाजपचा आमदार असल्याने प्रकरण देशभर गाजलं होतं. नंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 16 डिसेंबर : देशभर गाजत असलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीसहजारी कोर्टाने आज हा महत्त्वाचा निकाल दिला. सेंगर यांच्यासोबतच शशी सिंहलाही कोर्टाने दोषी ठरवलं असून शिक्षेची सुनावनी 19 डिसेंबरला होणार आहे. उत्तर प्रदेशातल्या सत्ताधारी आमदारानेच बलात्कार केल्याने प्रचंड वाद निर्माण झालं होतं. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे  2018च्या जून महिन्यात एका महिलेवर  बलात्कार करण्यात आला होता. हा बलात्कार भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेनगर केल्याचा आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणी पोलिसांकडे सर्व पुरावे होते. मात्र, अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. अखेर  सगळे पुरावे असताना अजूनही कुलदीप सिंह सेनगरला अटक का झाली नाही आता चौकशी पुरे झाली तातडीने अटक करा असे आदेश अलाहाबाद हायकोर्टाने दिल्यानंतर सेंगरला अटक करण्यात आली होती.

कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद

या प्रकरणाची  सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेतली होती.  सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील सर्व खटल्यांची सुनावणी उत्तर प्रदेशाबाहेर म्हणजे राजधानी दिल्लीत हलवली होती. या बलात्कार प्रकारणाची आतापर्यंतची झालेली तपासणी आणि पीडितेच्या अपघाताचा चौकशी अहवाल सोपवावा असे आदेश कोर्टानं सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिला होता.  उन्नाव प्रकरणासंबंधीत सर्व खटल्यांची सुनावणी यापुढे दिल्लीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. तसंच पीडितेच्या अपघाताची चौकशी सात दिवसांच्या आत करण्यासही सांगितलं होत.

पीडीतेला जिवंत जाळलं होतं.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे जामिनावर तुरूंगातून बाहेर नराधमांनी पीडितेला 5 डिसेंबरला सकाळी जिवंत पेटवले होते. पीडिता 90 टक्के भाजली होती तिची प्रकृती चिंताजनक होती अखेर तिचा मृत्यू झाला होता. तिला तातडीने उपचारासाठी लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले होतं. शुभम आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गदारोळ, सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंदुनगर पोलिस स्टेशन परिसरात गुरूवारी सकाळी ही घटना आहे. पीडिता बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी रायबरेली कोर्टात जात होती. रेल्वे पकडण्यासाठी ती पायी निघाली होती. तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला अडवले. तिला काही समजण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात पीडिता गंभीर भाजली गेली आहे. पीडितेने दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली होती. पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान शुभम आणि शिवम बलात्कार प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 16, 2019, 3:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading