गुन्हे कमी होण्याची 100 टक्के गॅरंटी प्रभू रामही देणार नाही, भाजपच्या मंत्र्याची मुक्ताफळं

गुन्हे कमी होण्याची 100 टक्के गॅरंटी प्रभू रामही देणार नाही, भाजपच्या मंत्र्याची मुक्ताफळं

'सरकारने कितीही प्रयत्न केला तरी गुन्हेगारी घटना पूर्णपणे रोखणं शक्य होणार नाही. समाजानेही बदलावं लागेल.'

  • Share this:

लखनऊ 05 डिसेंबर : उन्नाव (Unnao) आणि हैदराबाद (Hyderabad) बलात्कार प्रकरणावरून सध्या देशभर वातावरण तापलं आहे. महिलांची सुरक्षा, आरोपींना होणाऱ्या शिक्षा, दीर्घकाळ चालणारे खटले या सगळ्या प्रकरणांमुळे लोकांमध्ये असंतोष आहे. देशभर मोर्चे आणि निदर्शनं होत असल्याने महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. सगळ्या देशभर वातावरण तापलेलं असतानाच उत्तरप्रदेश मधल्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने मुक्तफळं उधळली आहेत. समाजातून 100 टक्के गुन्हेगारी घटना कमी होती याची गॅरंटी भगवान प्रभू रामही देऊ शकणार नाही असं या मंत्र्यांनी म्हटल्याने नवा वाद निर्माण झालाय. उत्तर प्रदेशचे नागरीपुरवढा मंत्री रणवेंद्र प्रताप सिंह (धुन्नी सिंह) यांनी एका बैठकीत बोलताना ही मुक्ताफळं उधळलीय.

आता भाजपमध्ये आऊट गोईंग, हा मोठा नेता आहे शिवसेनेच्या रडावर

सिंह म्हणाले, सरकार गुन्हेगारी रोखण्याचा पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करतेय. इतर सरकारांच्या काळात जास्त घटना घडत होत्या. राज्यात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर गुन्हेगारी निपटून काढण्यात यश मिळालंय. पण समाजात काही घटना घडत असतात. शंभर टक्के गुन्हेगारी कशी कमी करता येणार नाही असंही त्यांनी सांगितलंय.

काय झालं हैदराबादमध्ये?

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. संसदेतसुद्धा या घटनेचे पडसाद उमटले. पण त्याच वेळी एका स्थानिक वृत्तवाहिनीने पीडितेच्या कुटुंबीयांशी बातचीत करताना एका वेगळ्याच गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.

पती घेत होता चारित्र्यावर संशय, पत्नीने मुलाच्या मदतीने काढला असा 'काटा'

पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या तिच्या बहिणीला सांगण्यात आलं की, तिने 100 नंबर फिरवून मदत मागितली असती, तर कदाचित ती वाचली असती. पण पीडितेच्या बहिणीने यावर सांगितलेला अनुभव आणखी चीड आणणारा आहे. आपली बहीण बेपत्ता आहे. तिचा शोध घेऊनही ती सापडत नाही हे लक्षात येताच तिच्या घरच्यांनी 100 नंबर फिरवून पोलिसांची मदत मागितली होती. पण ज्या कर्मचाऱ्यानं त्यांचा फोन उचलला त्यांनी आधी त्यांच्याकडे आधार क्रमांकाची मागणी केली. आधी आधार नंबर सांगा आणि मग तुमची तक्रार नोंदवून घेतो, असं उत्तर त्यांना मिळालं.

आई अंगणात महिलांशी मारत होती गप्पा, घरात 8 वर्षीच्या बालिकेवर बलात्कार

पोलिसांची टाळाटाळ

ज्या वेळी पीडितेचे नातेवाईक तिच्या बेपत्ता असण्याची तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी प्रथम तुमची मुलगी कुणाबरोबर तरी फिरायला गेली असेल, असं सांगून टाळाटाळ करण्यात आली. मुलीबरोबर झालेल्या शेवटच्या संभाषणाचं रेकॉर्डिंगही तिच्या वडिलांना पोलिसांना ऐकवलं.

First published: December 5, 2019, 9:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading