Unlock-4 : केंद्राने तयार केल्या गाइडलाइन्स; शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर

Unlock-4 : केंद्राने तयार केल्या गाइडलाइन्स; शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर

केंद्राकडून शाळा सुरू करण्याच्या गाइडलाइन्स तयार करण्यात आल्या असून अनेक राज्यांनी त्यावर काम सुरू केलं आहे

  • Share this:

दिल्ली, 25 ऑगस्ट : केंद्र सरकारने अनलॉक 4 (Unlock - 4) ची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मॉल खुले करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी अनेक प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यातच गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत.

केंद्र सरकारने यासाठी गाइडलाइन्स (Unlock 4 Guidelines for Schools)  तयार केल्या आहेत. यावर सचिवांची टीम आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी चर्चा केली आहे. सांगितले जात आहे की, अंतिम अनलॉक गाइडलाइन्सदरम्यान याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काही राज्यांमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याची योजना तयारी करीत आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारांना या योजनेबाबत मुलांच्या पालकांचं समर्थन मिळत नाही. बैठकीचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे, त्यांनी सीनिअर वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आंध्रप्रदेशात 5 सप्टेंबरपासून सुरू होणार शाळा?

यादरम्यान आंध्रप्रदेशसह काही राज्यात 1 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. आंध्र सरकारने शाळा सुरू करण्याच्या बातमीवर अनेक पालकांनी विरोध केला आहे. वायएस जगनमोहन रेड्डी सरकार 5 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करीत आहे.

हे वाचा-ब्रम्हपुत्रा नदीवरुन जातोय तब्बल 2 किमीचा देशातील सर्वात लांब रोपवे, पाहा PHOTOS

उत्तर पूर्वेकडील राज्यात शाळा सुरू करण्याची तयारी

उत्तर पूर्वेकडील राज्य मणिपूर, मिजोराम, नागालँड मध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या कमी आहे. अशात ही राज्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत नव्या गाइडलाइन्सअंतर्गत येथे शाळा सुरू करण्यात येऊ शकतात. याशिवाय ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तेथे शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 25, 2020, 4:40 PM IST

ताज्या बातम्या