Home /News /national /

BREAKING : Unlock 3.0 चे नवे नियम केंद्राने केले जाहीर; लवकरच जिम होणार सुरू

BREAKING : Unlock 3.0 चे नवे नियम केंद्राने केले जाहीर; लवकरच जिम होणार सुरू

जिममध्येही बॅचच्या वेळा नक्की ठरविण्यात येतील, उपकरणांची सफाई, शिवाय एकाच वेळी ग्राहकांच्या उपस्थितीबाबत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मास्क लावून व्यायाम करण्याबाबत अनेक तज्ज्ञांचे वेगवेगळे तर्क आहेत.

जिममध्येही बॅचच्या वेळा नक्की ठरविण्यात येतील, उपकरणांची सफाई, शिवाय एकाच वेळी ग्राहकांच्या उपस्थितीबाबत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मास्क लावून व्यायाम करण्याबाबत अनेक तज्ज्ञांचे वेगवेगळे तर्क आहेत.

कोरोनाच्या कहरात अनेक गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या, मात्र आता हळूहळू अनेक व्यवसाय सुरू करण्यात येत आहे

    मुंबई, 29 जुलै : Coronavirus चा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नसला, तरी देशभरातल्या लॉकडाऊनचे नियम आणखी थोडे शिथिल होणार आहेत. केंद्र सरकारने Unlock 3.0 ची नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत योग इन्स्टिट्यूट आणि जिमला परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑगस्टपासून व्यायामाच्या संस्था सुरू होऊ शकतात. असे असले तरी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहिती लवकरच येण्याची शक्यता आहे. तूर्तास मात्र नागरिकांना जिम सुरू झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटात फैलाव होऊ नये यासाठी अनेक गोष्टींवर कडक निर्बंध लावले होते. गेल्या काही दिवसांपासून हळूहळू अनेक व्यवसायांना परवानगी दिली जात आहे. अनलॉक 3  मध्ये काही सवलती देण्यात आल्या असल्या, तरीही कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे हे वाचा-घाबरु नका! रिक्षाप्रवास असेल सुरक्षित; उबेर आणि बजाज ऑटोने उचललं पाऊल राज्यातही अनलॉक 3 चे नियम बदलू शकतात बुधवारी ( 29 जुलै) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे 31 जुलैनंतर लॉकडाऊन किती दिवस करावा, याबाबतही चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही गोष्टींना परवानगी देण्याची शक्यता आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Yoga

    पुढील बातम्या