Home /News /national /

शिवसेनेच्या नेत्यावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार, 1 जणाचा मृत्यू

शिवसेनेच्या नेत्यावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार, 1 जणाचा मृत्यू

हनी महाजन यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते थो़डक्यात बचावले आहे.

      गुरदासपूर, 10 फेब्रुवारी : शिवसेनेच्या उत्तर भारतातील प्रमुख हनी महाजन यांच्यावर अज्ञात हल्लखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हनी महाजन यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते थो़डक्यात बचावले आहे. तर त्याच्या शेजारी असलेल्या किराणा मर्चेंट अशोक कुमार यांचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी हनी महाजन हे डडवां रोडवरील आपल्या दुकानात बसलेले होते. संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केले. या गोळीबारात हनी महाजन थोडक्यात बचावले. परंतु, त्यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले. परंतु, त्यांच्या शेजारीच उभा असलेले अशोक कुमार यांच्या डोक्यात गोळी लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. स्थानिकांनी महाजन आणि अशोक कुमारला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परुंतु, अशोक कुमार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हनी महाजन गंभीर जखमी असून त्यांना अमृतसर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिक तपास करत आहे. वडील, आई आणि भावाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन! गडचिरोली शहरात आई-वडिलांसह भावाने एकत्र विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली येथे सोमवारी दुपारी घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र वरगंटीवार यांचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होतं. रवींद्र नागोराव वरगंटीवार ( वडील), वैशाली रवींद्र वरगंटीवार( आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार ( मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाच्या विषयावरुन अस्वस्थ असलेल्या कुटुबीयांची अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तिथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली. तिघांनीही आत्महत्येपूर्वी विहिरीबाहेर मोबाईल आणि चप्पला काढून ठेवल्या होत्या. विहिरीच्या काठावर मोबाईल आढळून आल्यामुळे तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ही माहिती शहरात पसरतात अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. आत्महत्येचं कारण स्पष्ट नसलं तरी मुलीच्या आंतरजातीय लग्नातूनच तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चा शहरात आहे. कुणीही या विषयावर कॅमेऱ्यात बोलायला तयार नाही. या ह्रदयद्रावक घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या