पुढच्या महिन्यात देशात पुन्हा धडकणार टोळधाड, 'या' 17 राज्यांना केलं अलर्ट

पुढच्या महिन्यात देशात पुन्हा धडकणार टोळधाड, 'या' 17 राज्यांना केलं अलर्ट

मान्सूनपूर्वी मे महिन्यात टोळधाड दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाले आणि 1962नंतर प्रथमच टोळधाडाचं संटक आलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जून : एकीकडे कोरोनाचं (Coronavirus) संकट तर दुसरीकडे टोळधाड (Locust Attack) , यामुळं आधीच सामान्य जनता हवालदिल झाली आहे. यातच आता पुन्हा टोळधाड भारतात धडकू शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अन्न व कृषी संघटनेने (एफएओ-FAO) दिला आहे. त्यानंतर केंद्राने सर्वाधिक बाधित राजस्थान आणि मध्य प्रदेशसह 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. FAOने गुरुवारी सांगितले की, मान्सूनपूर्वी मे महिन्यात टोळधाड दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाले आणि 1962नंतर प्रथमच टोळधाडाचं संटक आलं.

राजस्थानच्या वाळवंटात पावसाळा सुरू होताच प्रजननासाठी टोळधाड पूर्वे व पश्चिमेकडे फिरतील. त्यामुळे जूनमध्ये ते दक्षिण इराण आणि जुलैमध्ये हॉर्न ऑफ आफ्रिका (Horn of Africa) द्वीपकल्पात असतील. तज्ज्ञांच्या मते पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेती खराब करणारे टोळधाड एप्रिलमध्ये पाकिस्तानातून भारतात आले.

वाचा-गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमागे धक्कादायक खुलासा, अननसात नव्हते भरले फटाके तर...

FAOने सांगितले की उत्तर-पूर्व सोमालियाला पोहोचणारे टोळधाड कळप उत्तर हिंद महासागरातील भारत-पाकिस्तान सीमा भागात प्रवेश करणार आहे. सोमालिया आणि इथिओपियामध्येही अशीच परिस्थिती आहे. जूनच्या मध्यानंतर हे टोळधाड केनिया ते इथिओपिया आणि उत्तर सुदानपासून दक्षिण सुदानकडे जातील. मुख्य म्हणजे हे टोळ एका दिवसात 150 किलोमीटर पर्यंत उड्डाण करू शकतात आणि चौरस किलोमीटरची कळप जास्तीत जास्त 35,000 लोकांऐवढं खाऊ शकतात.

वाचा-घरं पडली, छपरं उडाली, चक्रीवादळाने गावं उघड्यावर PHOTOS पाहून उडेल थरकाप

चार दिवसांपासून टोळधाडचा कळप नाही

पूर्व आफ्रिकेत, वायव्य केनियामध्ये दुसर्‍या पिढीचे प्रजनन चालू आहे आणि अनेक हॉपर बँड तयार झाले आहेत जे जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून ते जुलैच्या मध्यापर्यंत अपरिपक्व स्वार्म्सना प्रोत्साहन देतील. राजस्थान सरकारच्या टोळधाड चेतावणी संस्थेचे (LWO) अधिकारी केएल गुर्जर म्हणाले की राजस्थानमधील बाडमेर आणि जोधपूर जिल्ह्यातील अनेक गावात टोळधाडचा हल्ला सुरू आहे. 65 हजार हेक्टर क्षेत्रावर टोळांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात टोळधाड दिसले नाही आहेत.

वाचा-मुंबई-ठाण्यात पुढील 2 तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

First published: June 6, 2020, 9:02 AM IST
Tags:

ताज्या बातम्या