गुवाहाटीचे अजब रेस्टॉरंट! टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल

गुवाहाटीचे अजब रेस्टॉरंट! टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल

गुवाहाटीमध्ये 'रेसिपीज रेस्टॉरंट' नावाचं एक हॉटेल आहे. या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे इथे ट्रेनद्वारे जेवण टेबलापर्यंत पोहचवलं जातं. या रेस्टॉरंटमध्ये वेटरच नाही आहेत.

  • Share this:

06 एप्रिल : तुम्ही हॉटेलमध्ये गेला साधारणत: वेटरला ऑर्डर देता आणि तोच वेटर तुमचं जेवण तुम्हाला टेबलवर आणून देतो. पण जर तुम्हाला म्हटलं की रेस्टॉरंटमध्ये वेटरच नाही तर... आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे.

गुवाहाटीमध्ये 'रेसिपीज रेस्टॉरंट' नावाचं एक हॉटेल आहे. या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे इथे ट्रेनद्वारे जेवण टेबलापर्यंत पोहचवलं जातं. या रेस्टॉरंटमध्ये वेटरच नाही आहेत.

सोशल मीडीयावर गुवाहाटीच्या या रेस्टॉरंटचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. रेस्टॉरंटच्या टेबलवर ट्रेनचा संपूर्ण सेट बनविण्यात आला आहे. त्यावर धावती ट्रेन ग्राहकांपर्यंत जेवण पोहचवते.

गुवाहाटीच्या शंकर डे मार्ग इथं 2 एप्रिल यादिवशी हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आलं आहे. संपूर्ण शहराच्या मनात बसलेलं हे रेस्टॉरंट सध्या चर्चेचा विषय बनलयं.

रेसिपीज रेस्टॉरंटमध्ये धावत्या ट्रेनला बघुन लोक चकीत होऊन जातात. या ट्रेनमध्ये खास ट्रॅक लावण्यात आला आहेत. ज्यावर जेवण ठेवून ग्राहकांपर्यंत जेवण पोहचवलं जातं. या रेस्टॉरंटमध्ये चाईनीज पदार्थांपासून ते जपानी पदार्थापर्यंत सर्व प्रकारचे जेवण उपलब्ध आहे.

या रेस्टॉरंटचे मालक संजय देबनाथ हे व्यवसायाने व्यापारी आहेत. देबनाथ यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ चाखून बघायला आवडतात. त्यांनी देशभरात प्रवास करुन तेथील पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. त्यांना रेस्टॉरंटची कल्पना एका विदेश दौरा करताना सुचली असं ते म्हणाले.

रेस्टॉरंटला याभागातील पहिलं 'ट्रेन रेस्टॉरंट' असं म्हटलं जातं. सध्या हे हॉटेल पाहण्यासाठी आणि तिथल्या पदार्थांची चव चाखण्यासाठी सगळ्यांची गर्दी पहायला मिळते.

First published: April 6, 2018, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading