Home /News /national /

VIDEO: लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा, पोलिसांनी लिहायला लावलं रामाचं नाव

VIDEO: लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना अजब शिक्षा, पोलिसांनी लिहायला लावलं रामाचं नाव

लॉकडाऊनचं नियम मोडणाऱ्यांना नागरिकांना पोलिसांकडून अजब शिक्षा दिली जात आहे. नागरिकांना अडवून त्यांच्याकडून हिंदू दैवत रामाचं नाव लिहून घेतलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाचं व्हायरल होतं आहे.

    सतना, 17 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्ण (Corona cases) झपाट्यानं वाढत आहेत. परिणामी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Corona lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी कोरोनाच्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कडक निर्बंध लादले असतानाही काही नागरिक कोरोना नियम पायदळी तुडवत रस्त्यावर मोकार फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षा दिली जात आहे. काही लोकांकडून शारीरिक व्यायाम करून घेतला जात आहे. तर काहींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एक पोलीस मात्र लॉकडाऊनचं नियम मोडणाऱ्यांना अजब शिक्षा देत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांच्याकडून हिंदू दैवत रामाचं नाव लिहून घेतलं जात आहे. लॉकडाऊनच्या नियमांच उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना 30 ते 45 मिनीटं थांबवून रामाचं नाव लिहायला सांगितलं जात आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबीयांची आणि आई वडिलांची काळीज घेण्याचा प्रेमळ सल्लाही दिला जात आहे. सतना जिल्ह्यातील सिंधी कॅम्प येथील बाबा दयालदास चौकात तैनात असलेल्या या पोलीस उपनिरीक्षकाची सोशल मीडियात जोरात चर्चा सुरू झाली आहे. असं असलं तरी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी संबंधित पोलिसाकडून घेतली जात आहे. मागील तीन दिवसांत एकूण 25 जणांना अशाप्रकारे शिक्षा दिली आहे. पण अद्याप याबाबत कोणीही तक्रार केली नाही. संबंधित पोलिस उपनिरीक्षकाचं नाव संतोष सिंह असं आहे. हे ही वाचा-पुण्यात गुंडाच्या अंत्ययात्रेत 150 बाईकची रॅली; VIDEO आल्यानंतर पोलिसांना जाग याप्रकरणी सतनाचे पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, त्यांना संतोष यांच्या कार्यपद्धतीबाबत कल्पना नाही. त्यांनी पुढं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “शहरात सध्या एकूण 20 चेक पॉईंट्स आहेत. या प्रत्येक ठिकाणी दोन शिफ्टमध्ये दोन पोलीस अधिकारी तैनात केलेले असतात. तर कारवाई म्हणुन रामाचं नाव लिहून घेण्याचा निर्णय हा संतोष सिंह यांचा स्वतःचा आहे. अशा प्रकारची शिक्षा देणं कायदेशीर नाही. त्यामुळे याचं कौतुक केलं जाऊ शकतं नाही. पोलिसांनी कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Lockdown, Madhya pradesh, Viral video.

    पुढील बातम्या