Home /News /national /

सोनं तस्करीसाठी तरुणाची अनोखी शक्कल; जीन्सचा कलर पाहून पोलिसांच्या चेहऱ्यावरील उडाला रंग

सोनं तस्करीसाठी तरुणाची अनोखी शक्कल; जीन्सचा कलर पाहून पोलिसांच्या चेहऱ्यावरील उडाला रंग

तस्करानं 302 ग्रॅम सोन्याची पेस्ट करून ती आपल्या जीन्सवर लावली आहे. (फोटो-लोकमत)

तस्करानं 302 ग्रॅम सोन्याची पेस्ट करून ती आपल्या जीन्सवर लावली आहे. (फोटो-लोकमत)

Gold Smuggling Case: दुबईहून भारतात सोनं आणण्यासाठी एका तस्करानं अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानं 302 ग्रॅम सोन्याची पेस्ट करून ती आपल्या जीन्सवर लावल्याची घटना समोर आली आहे.

    कन्नूर, 31 ऑगस्ट: विदेशातून एखादी बेकायदेशी वस्तू भारतात आणण्यासाठी तस्कर विविध मार्गांचा अवलंब करतात. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी विविध शक्कल लढवली जाते. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर पोटातून 18 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली होती. हे प्रकरण ताजं असताना, आता सोनं तस्करीसाठी एका तस्करानं अनोखी शक्कल लढवली आहे. आरोपीनं 302 ग्रॅम सोन्याची पेस्ट करून आपल्या जीन्सवर लावल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्कराच्या जीन्सचा रंग पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. केरळच्या केन्नूर विमानतळावर अधिकाऱ्यांनी एका सोने तस्कराला अटक केली आहे. संबंधित सोने तस्करानं 14 लाख 69 हजार रुपये किमतीच्या सोन्याची पेस्ट करून आपल्या जीन्सवर लावली होती. संबंधित जीन्सवरील सोन्याचा पिवळा रंग हा जीन्सवरील डिझाईन असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आरोपीला अडवून चौकशी केली असता, सोने तस्करीचा नवीन प्रकार उघड झाला आहे. हेही वाचा-शेजारीच उठले एकमेकांच्या जीवावर!; क्षुल्लक कारणावरून धारदार शस्त्रांनी वार मोहम्मद नवास असं अटक केलेल्या सोने तस्काराचं नाव आहे. त्यानं 14 लाख 69 हजार रुपये किमतीचं 302 ग्रॅम सोन्याची पेस्ट करून त्याचा रंग आपल्या जीन्सला दिला होता. संबंधित जीन्स परिधान करून तो विमानतळावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. पॅंटवरील पिवळा रंग पोलिसांना डिझाईन वाटेल, असं त्याला वाटलं होतं. परंतु आरोपी बाहेर पडत असताना त्याला विमानतळावरील अधिकाऱ्यांनी रोखलं आहे. हेही वाचा-पतीच्या भयंकर कृत्यानं औरंगाबाद हादरलं; पत्नीसमोरच चिरला स्वत:चा गळा, कारण समोर आरोपी नवास हा केरळच्या कासरगोडचा रहिवासी आहे. तो एअर इंडियाच्या आयएक्स 384 या विमानानं दुबईहून भारतात दाखल झाला होता. पण विमानतळावर उतरताच अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याजवळी सोन्याची जीन्स पोलिसांनी जप्त केली असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kerala

    पुढील बातम्या