मराठी बातम्या /बातम्या /देश /जबरदस्त! गायरान वाचवण्यासाठी ग्रामस्थांची अनोखी मोहीम; उभारणार 40 किलोमीटर लांबीची भिंत

जबरदस्त! गायरान वाचवण्यासाठी ग्रामस्थांची अनोखी मोहीम; उभारणार 40 किलोमीटर लांबीची भिंत

या गायरान जमिनीवर दररोज किमान चार हजार गायी चरण्यासाठी येतात. याशिवाय पाच हजार हरणं, एक हजारपेक्षा जास्त नीलगायी आणि चार हजार ससे यासह साप, उंदीर अशा असंख्य प्राण्यांचा हा अधिवास आहे.

या गायरान जमिनीवर दररोज किमान चार हजार गायी चरण्यासाठी येतात. याशिवाय पाच हजार हरणं, एक हजारपेक्षा जास्त नीलगायी आणि चार हजार ससे यासह साप, उंदीर अशा असंख्य प्राण्यांचा हा अधिवास आहे.

या गायरान जमिनीवर दररोज किमान चार हजार गायी चरण्यासाठी येतात. याशिवाय पाच हजार हरणं, एक हजारपेक्षा जास्त नीलगायी आणि चार हजार ससे यासह साप, उंदीर अशा असंख्य प्राण्यांचा हा अधिवास आहे.

    नवी दिल्ली, 17 जुलै : पर्यावरण संवर्धन (Save Environment), पर्यावरण संरक्षण, ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) असे शब्द आता सगळ्यांच्याच परिचयाचे झाले आहेत; पण बहुतेक वेळा ही सगळी जबाबदारी सरकारची आहे, असा पवित्रा घेत लोक स्वतः काही करण्यापासून अलिप्त राहतात. तर काही लोक मात्र आपलं अख्खं आयुष्य यासाठी ओवाळून टाकतात. अशीच एक व्यक्ती राजस्थानमध्ये (Rajasthan) आहे, जिनं पर्यावरण संवर्धनासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं आहे. या व्यक्तीचं नाव आहे बृजनारायण किराडू (Brujnarayan Kiradu). त्यांच्याच पुढाकारानं बिकानेरमध्ये (Bikaner) गायरान वाचवण्यासाठी एक अनोखा प्रकल्प साकारत आहे. बिकानेरमध्ये 27 हजार बिघे जमीन वाचवण्यासाठी 40 किलोमीटर लांबीची भिंत बांधण्यात येत आहे.

    दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, बिकानेरमध्ये उभारण्यात येणारी ही भिंत संपूर्णपणे लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे, हे याचं खास वैशिष्ट्य आहे. राजस्थानमधील कुंभलगढ (Kumbalgarh) इथं प्राचीन ऐतिहासिक वारसा असणारी 36 किलोमीटर लांबीची भिंत प्रसिद्ध आहे. 15 व्या शतकात महाराणा कुंभा यांनी ही उभारलेली ही भिंत ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ (Great Wall of India) म्हणून ओळखली जाते. जागतिक वारसास्थळात (World Heritage Site) तिचा समावेश असून ती जगप्रसिद्ध चीनच्या भिंतीनंतरची (Great Wall of China) दुसरी सर्वांत मोठी भिंत म्हणून ओळखली जाते. तशीच आता आधुनिक काळात पर्यावरण संरक्षणासाठी उभारली जाणारी बिकानेरमधील ही भिंत आधुनिक इतिहास निर्माण करेल.

    निशब्द! आर्मी भरतीचं स्वप्न अधुरचं; मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी सोडून विद्यार्थ्याची आत्महत्या

    बिकानेरमधील मुरलीधर व्यास नगर कॉलनीजवळ असणारी ही जमीन महाराजा करणसिंह (Maharaja Karansinh) यांनी गायींना (Cow) हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून आरक्षित केली होती. इथं अन्य प्राण्यांना चरण्याची परवानगी नाही. शेळ्या, उंट अशा अन्य प्राण्यांना इथं चारण्यासाठी सोडलं तर दंडाची तरतूद आहे. तरीही या जमिनीवर सतत अतिक्रमण होत आलं आहे. कोणी मंदिर उभारलं तर कोणी बाग उभारली आहे. अशा अतिक्रमणापासून ही जमीन वाचवण्याची जबाबदारी बृजनारायण किराडू यांनी घेतली आणि आपलं अख्खं आयुष्य त्यासाठी खर्ची घातलं. किराडू यांना अनेकदा खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्यात आलं, अनेकदा जीवघेणे हल्ले झाले, मात्र किराडू यांनी हार मानली नाही आणि आपलं काम सोडलं नाही.

    न्यायालयीन संघर्ष करत त्यांनी या जमीनीचं संरक्षण केलं आणि भूखंड माफियांच्या घशात जाण्यापासून ही जमीन वाचवली; मात्र चोरीछिपे या जमिनीवर होणारं अतिक्रमण थांबवायचं असेल तर या जमीनीच्या संरक्षणासाठी कायमस्वरुपी उपाय केला पाहिजे असा विचार सतत त्यांना सतावत होता. यासाठी त्यांनी गायरानासाठी काम करणारे माजी मंत्री देवीसिंह भाटी यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या जागेभोवती संरक्षक भिंत उभारणं हाच यावर योग्य पर्याय ठरेल यावर त्यांचे एकमत झालं आणि त्यांनी ही भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. अर्थात इतक्या मोठ्या जमिनीभोवती भिंत बांधण्यासाठी खर्चही प्रचंड आहे, याची जाणीव असल्यानं भाटी आणि किराडू यांनी जनतेला मदतीचं आवाहन केलं. विश्वास बसणार नाही; पण अवघ्या पंधरा मिनिटात तब्बल 50 लाख रुपये जमा झाले.

    भारत-चीन परिस्थितीबद्दल दिल्लीत बैठक; राजनाथ सिंह यांच्यासोबत ए. के. अँटनी, शरद पवारांची उच्चस्तरीय बैठक पार

    या 40 किलोमीटर लांब 9 इंच जाडीची भिंत बांधण्यासाठी 70 लाख विटा लागणार असून त्याकरता तब्बल 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या सगळ्या कामासाठी जनतेनं किरडू यांना उस्त्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळं 5 कोटी रुपयेही उभे राहतील आणि असंख्य जीवांचा अधिवास असणारी ही जमीन वाचेल लोकांना ऑक्सिजन देणारा हा हिरवा पट्टा सुरक्षित राहील असा विश्वास किराडू यांना वाटतो.

    या गायरान जमिनीवर दररोज किमान चार हजार गायी चरण्यासाठी येतात. याशिवाय पाच हजार हरणं, एक हजारपेक्षा जास्त नीलगायी आणि चार हजार ससे यासह साप, उंदीर अशा असंख्य प्राण्यांचा हा अधिवास आहे. या जमिनीवर तीन लाख शमीची झाडं असून बाभळी आणि अन्य प्रकारची अनेक झाडं आहेत. इथं पाण्याच्या अनेक कुंड, तळी आहेत. प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी टंकरनं पाणीपुरवठा केला जातो. असं हे जैववैविध्यतेनं नटलेलं मरुभूमीतील ‘ओअॅसिस’ (Oasis) नष्ट करण्यासाठी अनेक वक्र नजरा वळलेल्या आहेत. त्यापासून याचं रक्षण करण्यासाठी आता किराडूसारख्या योद्ध्याला जनतेची साथ मिळाली आहे. त्यामुळे मरुभूमीचं हे ‘हिरवं लेणं’ वाचेलच; पण त्यासाठी उभी राहणारी भिंत राजस्थानच्या जनतेनं दिलेल्या पर्यावरणासाठीच्या लढ्याची साक्ष देत पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

    First published:
    top videos

      Tags: Rajasthan