शहीद जवानाच्या पार्थिवासमोर Selfie, मोदींच्या मंत्र्यावर लोकांचा संताप

केंद्रीय मंत्र्यांना हे वागणं शोभतं का? नेटीझन्सचा सवाल

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 03:52 PM IST

शहीद जवानाच्या पार्थिवासमोर Selfie, मोदींच्या मंत्र्यावर लोकांचा संताप

वायनाड, 18 फेब्रुवारी : दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या पार्थिवाशेजारी उभा असलेल्या फोटोमुळे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली जात आहे. प्रथमदर्शनी पाहताना फोटो सेल्फी असल्यासारखा दिसतो मात्र तो सेल्फी नसून दुसऱ्या व्यक्तीने काढला असल्याचा दावा अल्फोन्स यांनी केला आहे. इतकंच नाही तर याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांमध्ये केरळमधील जवान वसंत कुमार हेदेखील होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अल्फोन्स यांनी शहीद जवान वसंत कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

अल्फोन्स यांनी वसंत कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोत ते सेल्फी घेत असल्यासारखे दिसते. यावरुन त्यांना सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागत आहेत. केंद्रीय मंत्र्यांना असं वागणं शोभतं का? असे प्रश्न विचारले आहेत. अल्फोन्स यांचा हा फोटो विरोधी पक्षांनीदेखील शेअर केला आहे.

सोशल मीडियावर टीका होत असताना अल्फोन्स यांनी केरळच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. माझी बदनामी केली जात असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच हा सेल्फी नसून दुसऱ्या व्यक्तीने फोटो काढला असल्याचा दावा अल्फोन्स यांनी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका असंही त्यांनही सांगितलं आहे.

पुलवामात झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आज सुरक्षादलाने पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा केला. यात भारतीय लष्कराच्या एका मेजरसह 4 जवानांना वीरमरण आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 02:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...