नवी दिल्ली 10 फेब्रुवारी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. राफेल प्रकरणावरून राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावर देशभर वादळ निर्माण झालं होतं. राहुल गांधींच्या एका व्यक्तव्यावरून देशभर वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर टीकची झोड उठली होती.
त्याच वक्तव्याचा आधार घेत स्मृती इराणींनी राहुल गांधींवर टीका केलीय. लढाऊ विमानाचा पायलट शहीद झाला तर त्याला राफेलमध्ये जो भ्रष्टाचार झाला तर त्यातून पैसा देता आला असता असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्याचा संदर्भ देत स्मृती इराणी म्हणाल्या की यावरून राहुल यांची मानसिकता दिसून येते.
#WATCH: Union Minister Smriti Irani says,"Ye (Rahul Gandhi) vo sajjan hain,jo ek sarvajanik manch par baith ke kehte hai ki agar tum shaheed ho jaoge toh main paise de dunga." pic.twitter.com/gUsU1Fz0Vk
— ANI (@ANI) February 9, 2019
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या,"ज्यांना सैनिकांच्या जीवाचं मोल नाही. त्यांना वाटतं सैनिक शहीद झाला की पैसे द्यायचे आणि म्हणजे काम झालं. असा लोकांची मानसिकता काय आहे हे दिसून येते."
राफेल प्रकरणी नवी कागदपत्र बाहेर आल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 हजार कोटी लुटल्याचा आरोप पुन्हा एकदा केला होता.