केंद्रीय मंत्र्यांनीच केलं क्वारंटाइनचं उल्लंघन, प्रश्न विचारताच दिलं हे उत्तर

केंद्रीय मंत्र्यांनीच केलं क्वारंटाइनचं उल्लंघन, प्रश्न विचारताच दिलं हे उत्तर

देशाच्या कानाकोपऱ्यात औषधं पोहोचली पाहिजेत याची काळजी मला घ्यावी लागते. मी घरीच बसून राहिलो तर याची काळजी कोण करणार?

  • Share this:

बंगळूरू 25 मे: तब्बल 62 दिवसानंतर आज देशांतर्गत विमानवाहतूक सुरू झाली. दिल्लीहून बंगळूरमध्ये आलेल्या पहिल्याच फ्लाईटमध्ये केंद्रीय औषध निर्माणमंत्री सदानंद गौडा हे दिल्लीतून बंगळूरमध्ये पोहोचले. कर्नाटक सरकारच्या नियमानुसर विमानाने आलेल्या प्रत्येकाला 7 दिवस संस्थात्मक आणि  14 दिवस घरातच क्वारंटाइन होण्याचा नियम आहे. मात्र गौडा आल्यानंतर त्यांनी नियमांचं पालन केलं नाही. त्यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

केंद्रीय मंत्रीच जर नियमांचं उल्लंघन करत असतील तर सामान्य लोक काय नियम पाळतील अशी टीका करण्यात येत होती. टीकेची झोड उठताच गौडा यांनी स्पष्टिकरण दिलं. ते म्हणाले, मी मंत्री आहे. त्यामुळए काही लोकांना या नियमांचा अपवाद करण्यात आला आहे. माझ्यावर देशात औषधांचा पुरवढा करण्याची जबाबदारी आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यात औषधं पोहोचली पाहिजेत याची काळजी मला घ्यावी लागते. मी घरीच बसून राहिलो तर याची काळजी कोण करणार असा सवाल त्यांनी केला.

कर्तव्यात कसूर नाही! घरी बसून फेस शील्ड तयार करतेय CRPF ची महिला जवान

चीन, इटली, स्पेन, अमेरिका, इराण नंतर आता भारत कोरोना व्हायरसचा नवा हॉट स्पॉट होत असल्याचा दावा जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर द वॉशिंग्टन पोस्ट मध्ये आलेल्या एका रिपोर्टने सगळ्यांची चिंता वाढवली आहे. भारतातला कोरोना व्हायरस अधिक शक्तिशाली झाला असून तो युवकांना मोठ्या संख्येने टार्गेट करत असल्याचं त्यात म्हटलं आहे. भारतात आत्तापर्यंत 1.38 लाख लोक बाधित झाले असून 4021 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जगातल्या ज्या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला त्या देशातल्या आकडेवारीवरून तिथे ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात बळी गेला आहे. मात्र विकसित आणि तरुण देश समजल्या जाणाऱ्या भारत आणि ब्राझिलमध्ये हा व्हायरस तरुणांचा जास्त बळी घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.

मजूर परत हवे असतील, परवानगी घ्या - योगी सरकारच्या नियमावरून महाराष्ट्रात वाद

 या अहवालानुसार ब्राझिलमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 50 पेक्षा कमी वयाचे 5 टक्के लोकं आहेत. स्पेन आणि इटलीच्या तुलनेत हे प्रमाण दहा टक्के जास्त आहे. तर भारतात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये  60 टक्के लोक हे 50 पेक्षा कमी वयाचे आहेत असंही त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

 

First published: May 25, 2020, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading