Home /News /national /

परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, प्रकरणावर केंद्राकडून आली पहिली प्रतिक्रिया

परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, प्रकरणावर केंद्राकडून आली पहिली प्रतिक्रिया

गृहमंत्र्यांच्या (Anil Deshmukh) राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अशात आता पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर केंद्राची प्रतिक्रिया आली आहे.

    मुंबई 21 मार्च : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अशात आता पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर केंद्राची प्रतिक्रिया आली आहे. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसाद म्हणाले, की गृहमंत्र्यांनी दर १०० कोटी रुपये गोळा करण्याचं सांगितलं असेल तर इतर मंत्र्यांनीही अशीच टार्गेट दिली असतील. उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं एक दिवसाठीही राज्य चालवण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असा सणसणीत टोला रवी शंकर प्रसाद यांनी लगावला आहे. सचिन वाझेला कोणाच्या दबावातून पोलीस दलात पुन्हा घेण्यात आले, असा सवालही प्रसाद यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात आरोप करण्यात आले आहे हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या पत्राचे दोन भाग आहे. त्यांच्या पत्रामध्ये, प्रत्यक्ष पैसे जमा करण्याविषयी कोणतीही माहिती नाही. हे पैसे कुठून घेतले आणि ते कधी हस्तांतरित केले गेले, याविषयी पत्रात काहीही सांगण्यात आले नाही. त्या पत्रावर परमबीर यांची सही नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Anil deshmukh, Maharashtra News

    पुढील बातम्या