...तर मग पाकव्याप्त काश्मीर आम्हाला द्या, रामदास आठवलेंनी पाकिस्तानला ठणकावलं

...तर मग पाकव्याप्त काश्मीर आम्हाला द्या, रामदास आठवलेंनी पाकिस्तानला ठणकावलं

काश्मीर मुद्यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे.

  • Share this:

चंदिगड,14 सप्टेंबर : काश्मीर मुद्यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. 'पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यातील काश्मीर (PoK) भारताच्या स्वाधीन करावा. कारण कित्येक वृत्तांमधून हेच समोर आले आहे की तेथील लोक पाकवर नाराज आहेत आणि त्यांना भारताचा हिस्सा होण्याची इच्छा आहे', अशा शब्दांत आठवले यांनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. चंदिगडमध्ये बोलत असताना आठवलेंनी हे विधान केलं आहे.

(वाचा :लँडर 'विक्रम'च्या संपर्कासाठी आता राहिले फक्त 7 दिवस, इस्रोने आशा सोडली नाही!)

ते म्हणाले की,'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानच्या पचनी पडलेला नसल्यानं त्यांच्याकडून पुन्हा काश्मीर मुद्दा उचलून धरण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू आहे. पाकिस्ताननं पीओके आता आम्हाला द्यायला हवा आणि हे करणंच पाकिस्तानसाठी हितार्थ ठरेल'.

(वाचा : मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 10 लाख कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार!)

आठवले पुढे असंही म्हणाले की,'जर पीओके आम्हाला सोपवला तर आम्ही तेथे कित्येक उद्योग उभारू. व्यापारात आम्ही पाकिस्तानची मदत करू आणि गरिबी-बेरोजगारीविरोधात लढण्यासाठी मदतदेखील करू'.  तसंच 'तणाव निर्माण होईल अशी बाष्फळ बडबडही पाकिस्ताननं करू नये', अशा शब्दांतही आठवले यांनी खडेबोल सुनावले आहेत.

(वाचा : पाकव्याप्त काश्मीरबद्दल इम्रान खान शुक्रवारी करू शकतात मोठी घोषणा)

SPECIAL REPORT: राजे मंडळींनी राष्ट्रवादीची साथ सोडली; पवार एकटे पडले?

Published by: Akshay Shitole
First published: September 14, 2019, 11:54 AM IST

ताज्या बातम्या