Home /News /national /

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हाथरसमध्ये, पीडित कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हाथरसमध्ये, पीडित कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

आठवले हाथरसमध्ये का जात नाहीत असा सवाल विरोधी पक्षांनी केला होता. या भेटीनंतर आठवले यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.

    नवी दिल्ली 06 ऑक्टोबर: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. आरपीआय या आपल्या पक्षाकडून त्यांनी पीडित कुटुंबीयांना 5 लाखांची मदतही केली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिलं. या भेटीनंतर आठवले यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. आठवले हाथरसमध्ये का जात नाहीत असा सवाल विरोधी पक्षांनी केला होता. आठवले यांनी कंगणा राणौत आणि पायल घोष या अभिनेत्रींना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता आठवले कुठे आहेत अशीही टीका करण्यात आली होती. आठवले यांनी या आधी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. अशातच भाजपचे एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक आणि संतापजनक विधान भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. उघड्या गटारीचा बळी! घाटकोपरला गायब झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला हाजीअलीला सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहे. हाथरस प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी मुक्तफळं उधळली. मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचा गोंधळ, Online परीक्षा देता न आल्याने संताप घटनेनंतर पोलिसांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले त्यावरून राज्य सरकारवर प्रचंड टीका झाली होती. पीडित मुलीचं पार्थिव कुटुंबीयांना न देता परस्पर अंत्यसंस्कार पोलिसांनी केले होते. त्यावरून प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Ramdas aathawle

    पुढील बातम्या