• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • BREAKING : केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चौघेजणं जखमी

BREAKING : केंद्रीय मंत्र्याच्या गाडीला अपघात; चौघेजणं जखमी

अत्यंत साध्या राहणीमानासाठीदेखी या केंद्रीय मंत्र्याला ओळखलं जातं. अपघातानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 • Share this:
  भुवनेश्वर, 9 मे : केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोप आलं आहे. बालेश्वर जिल्ह्यातील निलगिरी येथील पोडासुला चक येथे हा अपघात झाला आहे. रविवारी हा अपघात घडला. ट्रॅक्टरची धडक झाल्याने केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांना किरकोळ जखम झाली आहे. याशिवाय गाडीत त्यांच्यासोबत त्यांचे पीए, पीएसओ आणि ड्रायव्हर यांनाही किरकोळ जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर तातडीने सर्वांना निलगिरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. प्रताप सांरगी अत्यंत साध्या राहणीमानासाठीदेखील ओळखले जातात. ते सर्वसाधारणपणे प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. सारंगी आपल्या पेन्शनची रक्कम गरीबांमध्ये दान करतात. 64 वर्षीय प्रताप सारंगी यांनी कधी काळी साधु होण्याचा प्रयत्नही केला होता. ते एकांतात जीवन घालवू इच्छित होते, मात्र त्यांचं समाजाप्रती समर्पण आणि जनसेवेचा भाव पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात आणलं आहे, असे सांगितले जाते. अपघातानंतर केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: