नवी दिल्ली 8 ऑगस्ट: देशात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. मोदी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी (Union Minister of State for Agriculture Kailash Chaudhary) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. चौधरी यांनीच याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड चाचणी करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
जैसलमेरचे खासदार असलेले चौधरी हे मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी रात्री त्यांना ताप आला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना शंका आल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली.
चाचणीचे रिपर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जोधपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काळजीचं कुठलंही कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मतदारसंघात दौऱ्यावर असतांना त्यांनी अनेक ठिकानांना भेटी दिल्या होत्या. त्यामुळेच बाधा झाली असावी असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
Union Minister of State for Agriculture Kailash Chaudhary says he has tested positive for #COVID19
— Press Trust of India (@PTI_News) August 8, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 61 हजार 537 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 वर पोहोचला आहे.
Black Box सापडला: तुटलेलं विमान, मोडलेल्या खुर्च्या Photos पाहून उडेल थरकाप
देशात कोरोनामुळे 933 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा 42 हजार 518 वर पोहोचला आहे. 6 लाख 19 हजार 088 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. आतापर्यंत 14 लाख 27 हजार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
रांचीवरून मुंबईसाठी निघालेल्या विमानाला पक्षाची धडक, मोठा अपघात टळला
मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 48900 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. 15 जूनपर्यंत 51. 08 रिकव्हरी रेट होता त्यापैकी 7 ऑगस्टपर्यंत तो वाढून 67.98 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात 25 लाख 69 हजार 645 लोकांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी शुक्रवारी 10 हजार रुग्णांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus