मराठी बातम्या /बातम्या /देश /Electric गाड्यांना किलोमीटरमागे एक रुपयाच खर्च, भारतात EV क्रांती होणार : नितीन गडकरी

Electric गाड्यांना किलोमीटरमागे एक रुपयाच खर्च, भारतात EV क्रांती होणार : नितीन गडकरी

इलेक्ट्रिक वाहनं (Electric Vehicle) कमी खर्चात जास्त अंतर कापू शकतात. त्यामुळेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भरपूर होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहनं (Electric Vehicle) कमी खर्चात जास्त अंतर कापू शकतात. त्यामुळेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भरपूर होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहनं (Electric Vehicle) कमी खर्चात जास्त अंतर कापू शकतात. त्यामुळेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भरपूर होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

    नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे भाव (Petrol- Diesel Prize) सध्या रोज वाढताहेत आणि ते आधीच आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांना अनेकजण पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सध्या देशभरात (Electric Vehicles in India) चांगलाच लोकप्रिय होत आहे. सतत नवनव्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्स लाँच केल्या जात आहेत. अजून तरी या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय चांगला असला, तरी त्या घेण्याची सर्वसामान्यांची हिंमत होत नाही. आता मात्र हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या कार्सएवढ्याच होतील, असं गडकरी म्हणाले आहेत. याचाच अर्थ आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती कमी होतील असे संकेत गडकरींनी दिले आहेत. लवकरच या क्षेत्रात क्रांती होणार आहे, असं गडकरींचं म्हणणं आहे.

    'विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रति किलोमीटर एक रुपया एवढाच खर्च'

    इलेक्ट्रिक वाहनं कमी खर्चात जास्त अंतर कापू शकतात. त्यामुळेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भरपूर होईल, अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे. 'पेट्रोलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान 10 रुपये, डिझेलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान सात रुपये, तर विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रति किलोमीटर एक रुपया एवढाच खर्च येतो,' असं ते म्हणाले. अर्थातच हे सगळं चित्र आशादायी वाटतं. गॅसोलिन आणि डिझेलसारख्या पारंपरिक इंधनांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल आणि सीएनजीसारख्या पर्यायी इंधनांचा वापर केला जावा यावरही गडकरींनी भर दिला. इलेक्ट्रिक कार घेण्याची इच्छा आणि स्वप्न असणाऱ्यांसाठी गडकरींनी नक्कीच सकारात्मक बातमी दिली आहे.

    हेही वाचा : 'ओह ओह जाने जाना...'वर आजोबांचा आपला जलवा; डान्स पाहून शर्टलेस सल्लूलाही विसराल

    'पुढच्या दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पेट्रोल-डिझेलच्या वाहनांच्या बरोबर होतील'

    इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या FY21 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) ते बोलत होते. 'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या किमतींच्या पातळीवर येतील,' असं गडकरी म्हणाले आहेत. सरकार EV चार्जिंग सुविधा वाढवण्याचाही विचार करत आहे, असंही ते म्हणाले. '2023 पर्यंत प्रमुख राज्यमार्गांवर 600 EV चार्जिंग पॉईंट उभे केले जाणार आहेत. इतकंच नाही, तर सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या नवीन उर्जास्रोतांवर चालणारी चार्जिंग स्टेशन स्थापन करण्याबद्दलही सरकार विचार करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

    हेही  वाचा : इंधन दरवाढीनंतर आता वीजबिलंही महागणार? केंद्र सरकार नवं विधेयक मांडणार

    'भारतात आता EV क्रांती येण्याची अपेक्षा'

    सध्या EV ची संख्या कमी असल्याने त्यांच्या किंमती जास्त आहेत. भारतात आता EV क्रांती येण्याची अपेक्षा सगळेच जण व्यक्त करत आहेत. यासाठी 250 स्टार्टअप व्यवसाय EV उपलब्ध आहेत. त्याशिवाय देशातले प्रमुख वाहन निर्माते इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी झाले आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी (GST) 5 टक्के आहे आणि लिथियम–आयन बॅटरीच्या किमतीही कमी होऊ लागल्या आहेत, अशी माहिती गडकरींनी दिली.

    First published: