मराठी बातम्या /बातम्या /देश /

विमानातल्या प्रवाशाची बिघडली तब्येत, केंद्रीय मंत्री कराडांनी वाचवले प्राण; मोदींनीही केलं कौतुक

विमानातल्या प्रवाशाची बिघडली तब्येत, केंद्रीय मंत्री कराडांनी वाचवले प्राण; मोदींनीही केलं कौतुक

भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी विमान (Flight) प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवले.

भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी विमान (Flight) प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवले.

भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी विमान (Flight) प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवले.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: मंगळवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी विमान (Flight) प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवले. इंडिगो (Indigo Flight) दिल्ली-मुंबई विमानाच्या प्रवासादरम्यान एका प्रवाशाला अस्वस्थता जाणवण्यास सुरुवात झाली आणि त्याला आणि चक्कर येऊ लागली. अशा परिस्थितीत स्वत: केंद्रीय मंत्र्याने त्यांना मदत करून त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. केंद्रीय मंत्री कराड हे बालरोगतज्ज्ञ देखील आहेत. त्यांनी त्या प्रवाशावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही कौतुक केलं आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी इंडिगो विमानात एका व्यक्तीला प्रथमोपचार देऊन त्याचे प्राण वाचवले. यानंतर डॉ. भागवत कराड यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून कराड यांचं कौतुक केलं आहे. तर डॉ. कराड यांनीही ट्विट करून आभार मानले आहेत.

कराड यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रवाशाने रक्तदाबाच्या समस्येमुळे चक्कर येत असल्याची तक्रार केली होती. त्याची प्रकृती ठिक नव्हती. यानंतर कराड यांनी प्रवाशाला गाठून प्राथमिक उपचार केले. निवेदनानुसार डॉ. कराड यांनी आजारी पडलेल्या प्रवाशाला मदत केली.

हेही वाचा- प्रेमात आंधळी झालेल्या महिलेनं सुखी संसाराचा केला सत्यानाश; Boyfriend साठी पतीला सोडलं पण... 

दुसरीकडे, विमान प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या सहप्रवाशाला मदत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे कौतुक केले. PM मोदी म्हणाले, 'नेहमीच मनाने डॉक्टर, माझ्या सहकाऱ्याने केलेले अप्रतिम काम.'

ANI या वृत्तसंस्थेनं शेअर आलेल्या फोटोमध्ये विमानात एक प्रवासी आजारी पडला असून डॉक्टर कराड त्याला मदत करत असल्याचं दिसत आहे. यावर कराड सांगतात, 'प्रवाशाचा ब्लड प्रेशर कमी होतं आणि त्याला सतत घाम येत होता. त्यामुळे त्याचे कपडे काढून त्याचे पाय सरळ केले. त्यानंतर त्याच्या छातीवर घासण्याचं सुरुवात केली. प्रवाशाला ग्लुकोजही दिलं. जवळपास 30 मिनिटांनंतर प्रवासी ठिक झाला.

हेही वाचा- प्रदूषणामुळे राजधानी Delhiची अशी झाली आहे अवस्था, लागू केले 'हे' निर्बंध

केंद्रीय मंत्री कराड यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. त्यांनी लिहिले, धन्यवाद, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी. मी खरोखरच नम्र आहे आणि माझ्या कर्तव्यात देश आणि नागरिकांप्रती तुमची वचनबद्धता आणि समर्पण पूर्ण करण्यासाठी मी उत्सुक आहे. 'सेवा आणि समर्पण' च्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाचं पालन करत आहे. जय हिंद.

First published:

Tags: Pm modi