नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येताच मंत्रिमंडळात धावाधाव सुरू झाली आहे. यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आताच हाती आलेल्या बातमीनुसार केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सांगितले जात आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ज्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं होतं. चाचणी केल्यानंतर मंगळवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. धर्मेंद्र प्रधान बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत सहभागी झाले नव्हते.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
रविवारीच गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब ट्विट करुन सांगितली आहे. त्यांच्यावरही मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहे.अमित शहा यांनी रविवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की काही प्राथमिक लक्षणांनंतर कोरोना चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत बरी आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात भर्ती होत आहे. अमित शहा हे एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेस नेत्यांकडून टीका केली जात होती. गृहमंत्री कोरोनावर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात का दाखल झाले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.