S M L

राहुल गांधी मानसिक रुग्ण, भाजप मंत्र्यांची जीभ घसरली

त्यानंतर चौबे यांनी आपला मोर्चा राहुल गांधी यांच्याकडे वळवला. चौबेंनी राहुल यांची तुलना चक्क नाल्यातील किड्यासोबत केली.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2018 03:27 PM IST

राहुल गांधी मानसिक रुग्ण, भाजप मंत्र्यांची जीभ घसरली

01 सप्टेंबर :  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत असताना चौबे यांनी राहुल गांधी यांची तुलना नाल्यातील किड्यासोबत केली. चौबे एवढ्यावर थांबले नाहीतर त्यांनी राहुल गांधींना मानसिक रुग्णाची उपमाही देऊन टाकली.

बिहारचे भाजपचे नेते आणि केंद्रीय अश्विनी चौबे एक कार्यक्रमात उपस्थितीत होते. त्यावेळी भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक एकवटले आहे. पण त्यांना माहिती नाही केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता खूप मोठी आहे त्यामुळे ते जिंकू शकत नाही.

त्यानंतर चौबे यांनी आपला मोर्चा राहुल गांधी यांच्याकडे वळवला. चौबेंनी राहुल यांची तुलना चक्क नाल्यातील किड्यासोबत केली.पंतप्रधान मोदींना हरवण्याचं स्वप्न पाहणारे राहुल गांधी त्यांच्याबद्दल काहीही बोलतात. ते एका आजाराने ग्रस्त झाले आहे. त्यामुळे ते स्वत: काँग्रेसमुक्त भारत करत आहे.  मुळात राहुल गांधी हे मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्यांना मनोरुग्ण सिजोफ्रेनिया झालाय असा शोधच चौंबे यांनी काढलाय.

विरोधकांनी महाआघाडी केली आहे पण हे ठगबंधन आहे त्यांना जनतेचा शाप लागेल अशी टीकाही चौबे यांनी केली.

त्यानंतर त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावरही टीका केली. प्राण्यांचा चारा खाला आता त्यांना जेलमध्ये राहावं लागत आहे. गरीबांची फसवणूक करणाऱ्यांसोबत असेल होते अशी टीका त्यांनी केली.

Loading...
Loading...
Loading...

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2018 03:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close